Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुक्ताईनगर मध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांचा झेंडा

Maharashtra Assembly Election Result 2024 : भाजपचे जेष्ठ नेते राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांचा दारुण पराभव केला आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत गुंतागुंतीचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची राजकीय ओळख आहे .

Chandrakant Patal Win

मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील हा जुना संघर्ष आहे. एकनाथ खडसे यांच्या एक छत्री अमलाला चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या संघर्षात खडसे पिछाडीवर पडले, त्यांचे मंत्रीपद गेले आणि चंद्रकांत पाटील यांची ताकद वाढू लागली. 2019 साली शिवसेना जिल्हाप्रमुख असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपकडून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला. हा पराभव खडसे यांच्या जिव्हारी लागला.

कालांतराने एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि विधान परिषदेवर गेले. या काळात जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हा संघर्ष रंगला. महाजन यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न खडसे यांनी केले. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिताफीने महाजन यांचा बचाव केला. 2022 साली जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण उभारले. या बंडाला चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दिला आणि ते थेट शिवसेनेत दाखल झाले. दुसरीकडे आपण भाजप प्रवेश केला आहे असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. मात्र राज्य भाजपमधील कुठल्याही नेत्याच्या व्यासपीठावर एकनाथ खडसे कधीही दिसून आले नाहीत. एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या रावेरच्या खासदार असून केंद्रात मंत्री आहेत.

कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य पदाधिकारी आहेत. एकनाथ खडसे कागदोपत्री राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार असले तरी आपण भाजपमध्ये असल्याचे ते सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार झाली.

एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावली असून रोहिणी खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. खडसे यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली असून आता यापुढे मुक्ताईनगर मधील खडसे कुटुंबात रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे अशी नवी पिढी सांभाळणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+