लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? नवीन अपडेट!
राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० चा आर्थिक लाभ दिला जातो. मात्र, जुलै २०२५ महिन्याचा लाभ अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे सर्वांचे लक्ष यावर लागले होते. आता याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचे पैसे या महिन्याच्या अखेरपर्यंत, म्हणजेच ३१ जुलै २०२५ पर्यंत, किंवा पुढील महिन्याच्या ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत लाडक्या बहिणींना दिले जातील. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींसाठी एक प्रकारे मासिक वेतनच असून, ते वेळेत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
योजनेचे सद्यस्थिती आणि लाभार्थी संख्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी 'लाडकी बहीण' योजना सुरू केली होती. जून महिन्यात या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. योजनेचा पहिला लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख बहिणींना मिळाला होता, त्यानंतर ही संख्या कमी-जास्त होत गेली. सध्या राज्यात २ कोटी ३४ लाख लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे ५० हजार कोटींचा बोजा पडतो.
छाननी प्रक्रिया सध्या स्थगित
या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यासाठी, प्राप्तीकर भरणार्या महिलांच्या कुटुंबांचा डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून राज्य सरकारने मागवला होता. हा डेटा मिळाल्यावर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांची छाननी होऊन अपात्र महिलांना वगळले जाईल अशी शक्यता होती.
मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या) निवडणुका लक्षात घेता, सरकारने सध्या ही प्रक्रिया थांबवली आहे. महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल. त्यानंतरच सरकार छाननीबाबत पुढील पावले उचलेल अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications