श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी भावनिक पोस्ट, 'खूप अभिमान वाटतो बाबा'
मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 27 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील आपल्या निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले की, मी स्वत: पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा यांना फोन करून सांगितले.
सरकार बनवताना कुठलीही अडचण नाही. तुम्ही तुमचा जो निर्णय घ्यायचा आहे तो एनडीए म्हणून आम्हाला मान्य असेल. भारतीय जनता पार्टीसाठी जसा अंतिम आहे, तसाच एकनाथ शिंदे यांना देखील म्हणजेच शिवसेनेला देखील मान्य असणार आहे, अशी भूमिका शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी कालची पत्रकार परिषद संपल्यानंतर एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या वडीलांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील कामाचं कौतूक केलं आहे. श्रीकंत शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणातात की, "मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले.
समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला," असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी आपल्या वडिलांचं कौतुक केलं आहे.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 27, 2024
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!" असं श्रीकांत शिंदे यांनी आपल्या टिट्ट मध्ये आहे.












Click it and Unblock the Notifications