CMच्या रेसमध्ये नाव असताना मुरलीधर मोहोळ पुणेकरांसाठी देणार खास गिफ्ट; रेल्वेमंत्र्यांसोबत झाली बैठक

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. अशातच मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांचे नाव देखील समोर आले. मुरलीधर मोहोळ हे सद्या पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री देखील आहेत. एकीकडे महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी यावर ट्विट करत मी केंद्रातच काम करणार असल्याचे सांगून आमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असे देखील स्पष्ट केले. दरम्यान, त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुणेकरांसाठी महत्त्वाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

नवी दिल्ली येथे गुरुवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली. पुणे आणि नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी मागणी त्यांनी केली. तसेच या भेटी दरम्यान, त्यांनी राज्यांतर्गत कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक आणि पुणे-कोल्हापूर या प्रादेशिक मार्गांवर वंदे भारत मेट्रो सेवा सुरू करण्यासंदर्भातला प्रस्तावही मांडला.

MP Murlidhar Mohol meets Minister Ashwini Vaishnaw

पुणे आणि जोधपूर दरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा दाखला देत मोहोळ यांनी रेल्वेमंत्र्यांना या दोन शहरांमधील गाड्यांची संख्या देखील वाढविण्याची मागणी केली आहे.

रेल्वे कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त, मोहोळ यांनी पुण्याच्या विकासाशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रकाश टाकला. यामध्ये पुणे आकाशवाणीचे आधुनिकीकरण, कार्यक्रम विभागातील रिक्त पदे भरणे आणि आकाशवाणी आणि विविध भारतीचे प्रसारण मुंबई ऐवजी पुण्यातून स्थानिक पातळीवर व्यवस्थापित केले जावे, अशी देखील मागणी केली आहे. दोन्ही नेत्यांमधील भेटीमुळे आगामी काळात लवकरच पुणेकरांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते.

बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली...

१. पुणे आकाशवाणीचे प्रसारण मुंबईऐवजी पुणे केंद्रावरूनच व्हावे आणि पुण्यासाठी 'रेन्बो' रेडिओ चॅनेल सुरु करावे.
२. पुणे आकाशवाणीत अद्ययावत सामग्री उपलब्ध व्हावी आणि कार्यक्रम विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात.
३. ⁠पुणे-दिल्ली दरम्यान 'वंदे भारत स्लीपर ट्रेन' सुरु व्हावी.
४. ⁠पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर या दरम्यान 'वंदे भारत' तरतूद व्हावी.
५. ⁠पुणे दूरदर्शन केंद्र अद्ययावत व्हावे.
६. ⁠पुणे ते जोधपुर (राजस्थान) दरम्यान सुरु असलेल्या रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढावी.

सोशल मीडियावर दिली माहिती

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्स हँडलवर बैठकीबाबतची माहिती शेअर केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या जातील. तर काही मागण्यांवर तात्काळ कारवाई देखील सुरू होईल, असे आश्वासन मोहोळ यांना देण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+