मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध :आम्ही काय करणार हे सांगत मतदारांना राज ठाकरेंनी कोणती दिली आश्वासनं? वाचा
MNS manifesto published Raj Thackeray criticizes on MVA Mahayti : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आज मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज मुंबईत जाहीर केला. आम्ही हे करु अशा नावाने त्यांनी हा जाहीनामा प्रसिद्ध केला आहे.

17 नोव्हेंबरची शिवाजी पार्कवरील सभा रद्द
राज ठाकरे म्हणाले, अनेक पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले. मनसेचा जाहीरनामा मी आज प्रसिद्ध करतोय. माझी सतरा तारखेची सभा शिवाजी पार्कवरची त्याला अद्याप परवानगी आलेली नाही. त्यामुळे माझ्याकडे त्या सभेसाठी उरला आहे. त्यामुळे ती सभा आम्ही करणार नाही. त्याऐवजी आम्ही मुंबई ठाणे या भागात सर्व मतदारसंघात दौरा होणार आहे.
ब्ल्यु प्रिंटवरुन माझी खिल्ली उडवली!
राज ठाकरे म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यात आम्ही काय आणि कसे करु हे नमूद केले आहे. मी काल परवाच सांगितले की, 2006 साली मी महाराष्ट्राची ब्ल्यु प्रिंट घेऊन येईल असे सांगितले होते. 2014 ला आमची ब्ल्यु प्रिंट आली. या काळात मला अनेक पत्रकार परिषदेत हिनवले गेले. कुत्सित प्रश्न विचारले गेले. जेव्हा 2014 ला माझी ब्ल्यु प्रिंट आली तेव्हा मी समजू शकतो की, त्यावेळी भाजप - शिवसेनेची युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षांत त्या ब्ल्यु प्रिंटमध्ये काय आहे ती कशी केली असा एकही प्रश्न आजपर्यंत कुणी मला विचारला नाही त्याबद्दल धन्यवाद (उपरोधिकपणे).
राज ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध
राज ठाकरे म्हणाले, ब्ल्यु प्रिंटमध्ये माझ्या जे आहे तेच प्रश्न आजही कायम आहेत, त्यातीलच काही प्रश्न मी या जाहीरनाम्यातून आपल्यासमोर मांडत आहोत आणि त्याचे निराकरणही करु. खालील मुद्द्यांवर भर देत राज ठाकरे यांनी या मुद्द्यांचे निराकरणही जाहीरनाम्यातून दिले आहे.
- मुलभूत गरजा आणि जीवनमान यावर राज ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात भर दिला.
- दळणवळण वीज, शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, इंटरनेट व्यवस्थापन
- राज्याचे औद्योगिक, व्यापर धोरण. प्रशासकीय़ नियंत्रण, कृषि पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण
- मराठी अस्मिता, मराठी दैनंदिन वापर, प्रशासनात मराठी वापर, डिजिटल जगात मराठी, शिक्षणात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी मराठी साहित्य प्रसार, गड आणि किल्ले संवर्धन, पारंपारिक खेळ
राज ठाकरेंचा जाहीरनामा डिजिटल स्वरुपात
राज ठाकरे म्हणाले अजून एक पुस्तिका आम्ही काढली असून आम्ही काय केले कोणती आंदोलन केली, काय काय झाले यासंदर्भातही आम्ही पुस्तिकेतून माहिती दिली आहे. दोन्ही जाहीरनामे डिजिटली आहेत, त्यामुळे प्रिंट किती केल्या याचे आकडे नाहीत.
आर्थिक लाभाच्या योजनांच्या घोषणांना आता अर्थ नाही
राज ठाकरे म्हणाले की, आधीच राज्य सरकारने आर्थिक लाभाच्या योजनांची घोषणा केली आहे. त्यात आम्ही पुन्हा अशाच योजनांच्या घोषणा करण्यात अर्थ नाही. राज्यावर आर्थिक बोजा न येता जर त्या यापुढे चालू राहिल्या तर मी याला गिफ्ट म्हणेल, पण उद्या जर या गोष्टी चालू ठेवता आल्या नाही तर मी याला लाच म्हणेल. राज ठाकरे यांचा रोख राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर होता.
विद्यामंदिरं उभारावे
राज्याचे आर्थिक गाडा चांगला चालावा हा माझा उद्देश आहे, महिलांना आर्थिक मदत मिळावी चांगली गोष्ट आहे पण त्यातून आपण पुढचे खड्डे खणत तर नाही ना याचा विचार करायला हवा. शिवाजी महाराजांचे मंदिरं उभारण्यापेक्षा विद्यामंदिर आवश्यक आहे, तर शिवाजी महाराजांच्या मंदिराऐवजी त्यांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.
राज ठाकरे म्हणाले, आमच्या जाहीराती निवडणूक आयोगाने रद्द केल्या. त्यांचे काय चालते हे लक्षात येत नाही ते अजूनही पुर्वीच्या जगात आहेत असे वाटते.












Click it and Unblock the Notifications