भाजपनंतर एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या पक्षांकडून मंत्रीपदासाठी कुणाकुणाला गेले फोन? वाचा एका क्लिकवर
Ministers Oath ceremony : महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाच डिसेंबरला मुंबईत पार पडला. त्यानंतर आता अकरा दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. आज नागपुरात महायुतीच्या जवळपास 35 ते 40 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. आज सकाळी भाजपने त्यांच्या संभाव्य मंत्र्यांना काॅल केल्यानंतर आता एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या पक्षांकडून मंत्रीपदासाठी काॅल्स केले जात आहेत.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निर्णयानंतर आता हे काॅल पक्षांमार्फत संभाव्य मंत्र्यांना केले जात आहेत. या नेत्यांना काॅल करुन मंत्रिपदासाठी निमंत्रित केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फार्म्युला ठरला असून मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) 10 मंत्र्यांचा समावेश आहे. अर्थातच 288 सदस्यसंख्या असल्याने 43 मंत्री महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : मंत्रिमंडळाचा शपथविधी..! तारीख, वेळ, ठिकाण ठरले; खातीही ठरली.. फक्त 'हाच' काय तो ट्विस्ट
भाजपकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन?
- नितेश राणे
- शिवेंद्रराजे भोसले
- चंद्रकांत पाटील
- पंकज भोयर
- मंगलप्रभात लोढा
- गिरीश महाजन
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- राधाकृष्ण विखे पाटील
- गणेश नाईक
- मेघना बोर्डीकर
- जयकुमार गोरे,
- अतुल सावे,
- माधुरी मिसाळ,
- चंद्रशेखर बावनकुळे
हेही वाचा : प्रतिक्षा संपली! भाजपकडून शपथविधीसाठी फोनकाॅल्स! आज नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी, 'हे' होणार मंत्री
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन?
- उदय सांमत
- प्रताप सरनाईक
- शंभूराज देसाई
- योगश कदम
- आशिष जैस्वाल
- भरत गोगावले
- प्रकाश आबिटकर
- दादा भूसे
- गुलाबराव पाटील
- संजय राठोड
- संजय शिरसाट
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन?
- आदिती तटकरे
- बाबासाहेब पाटील
- दत्तमामा भरणे
- हसन मुश्रीफ
- नरहरी झिरवाळ












Click it and Unblock the Notifications