प्रतिक्षा संपली! भाजपकडून शपथविधीसाठी फोनकाॅल्स! आज नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी, 'हे' होणार मंत्री
Ministers Oath ceremony : महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल लागले. महायुतीला भरभरुन यश मिळाले. मुख्यमंत्रीपदाचा तिढा संपत नसतानाच कशी-बशी दिलजमाई झाली आणि मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाच डिसेंबरला मुंबईत पार पडला. त्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. आज नागपुरात महायुतीच्या जवळपास 35 ते 40 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फार्म्युला काय?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फार्म्युला ठरला असून मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) 10 मंत्र्यांचा समावेश आहे. अर्थातच 288 सदस्यसंख्या असल्याने 43 मंत्री महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

आज कधी आहे शपथविधी
नागपूरच्या राजभवनात आज दुपारी तीननंतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासाठी राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यपालही नागपुरात पोहचल्याचे सांगण्यात आले असून संभाव्य मंत्र्यांसह काही इच्छुकांनीही नागपुरात हजेरी लावली आहे. कारण ऐनवेळी कुणाचेही नाव रेसमध्ये येऊ शकते हे पाहता इच्छुकांनी ऐनवेळी होणारी गडबड टाळली आहे.
भाजपकडून शपथविधी सोहळ्यासाठी नेत्यांना फोन काॅल्स
भाजपच्या ईच्छूक आमदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून भाजपने अधिकृतपणे नेत्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन काॅल्स करणे सुरु केले आहे अशी सुत्रांची माहिती आहे. यामध्ये नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार असून चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांनाही पुन्हा एकदा संधी मिळणार आहे तर यावेळी पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात सहभागी होणार हेही स्पष्ट झाले आहे.
भाजपचे हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार?
1) मंगलप्रभात लोढा, मुंबई
2 आशिष शेलार, मुंबई
3 अतुल भातखळकर, मुंबई
4) रविंद्र चव्हाण, कोकण
5) नितेश राणे, कोकण
6) शिवेंद्रसिंहराजे भोसले,पश्चिम महाराष्ट्र
7) गोपीचंद पडळकर,पश्चिम महाराष्ट्र
8) माधुरी मिसाळ,पश्चिम महाराष्ट्र
9) राधाकृष्ण विखे पाटील,पश्चिम महाराष्ट्र
10) चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ
11) संजय कुटे, विदर्भ
12) गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्र
13) जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्र
14) पंकजा मुंडे, मराठवाडा
15) अतुल सावे, मराठवाडा
शिवसेनेचे हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार?
1) उदय सामंत, कोकण
2) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5) संजय राठोड, विदर्भ
6) संजय शिरसाट, मराठवाडा
7) भरतशेठ गोगावले, रायगड
8) प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
9) योगेश कदम, कोकण
10) आशिष जैस्वाल, विदर्भ
11) प्रताप सरनाईक, ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ?
1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे
हे नेत राज्यमंत्री होणार?
1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक












Click it and Unblock the Notifications