फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट, म्हणाले, तो ट्रँगल....
ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सध्या गाजत असलेल्या विविध प्रकरणांवर आणि राजकीय टीका-टिप्पणीवर आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. विशेषतः फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येवरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल त्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत निशाणा साधला आहे.

फलटण प्रकरणावर गौप्यस्फोट
डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, या दुःखद घटनेवर केवळ राजकारण केले जात आहे. त्यांनी घटनेची वेगळी बाजू समोर आणत एक महत्त्वपूर्ण दावा केला.
"मी त्या भगिनीचा आदर करतो, मात्र मोबाईल चॅटिंगवरून या प्रकरणात एक 'ट्रँगल' असल्याचे दिसून येते. त्याची वस्तुस्थिती वेगळी आहे आणि ती लोकांसमोर आणण्यासारखी नाही," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यापूर्वी त्यांनी 'लोकशाही' वृत्तवाहिनीच्या बातमीची दखल घेत, 'दोषींवर कठोर कारवाई' करण्याचे आश्वासन दिले होते.
रामराजे नाईक निंबाळकरांवर सडकून टीका
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वाद-प्रतिवादावर बोलताना गोरे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली.
"जनतेने रामराजे नाईक निंबाळकर यांना खालून-वरुन, पुढून-मागून अशा सगळ्या बाजूने ४० वर्षे ओळखले आहे," या शब्दांत त्यांनी रामराजेंच्या भूमिकेवर प्रहार केला.
एकूणच, फलटण प्रकरणावरून विरोधक करत असलेल्या राजकारणावर गोरे यांनी गंभीर आरोप करत, मोबाईल चॅटिंगच्या आधारे 'ट्रँगल'ची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकरांना खोचक टोला लगावून त्यांनी राजकीय वातावरण तापवले आहे.












Click it and Unblock the Notifications