MHT CET 2025 : आज एमएचटी सीईटीची मेरीट लिस्ट होऊ शकते जाहीर! कशी बघायची गुणवत्ता यादी? जाणून घ्या
MHT CET Provisional Merit List 2025 : 'एम एच सीईटी' (MHT CET) राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने १६ जून २०२५ रोजी PCM गटाचा निकाल जाहीर केला. तर १७ जून २०२५ रोजी PCB चा निकाल जाहीर केला. त्यानंतर गुणवत्ता प्रक्रियाही पुर्ण झाली असून आता यादी लवकरच जाहीर होईल. ही गुणवत्ता यादी आज जाहीर होऊ शकते.
गुणवत्ता यादी तारीख, वेळ, cetcell.mahacet.org वर थेट डाउनलोड लिंक: समुपदेशन प्रक्रियेसाठी नोंदणी केलेले उमेदवार fe2025.mahacet.org या अधिकृत MAHACET वेबसाइटला भेट देऊन गुणवत्ता यादी पाहू शकतात. माहितीसाठी अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे.

महाराष्ट्र सीईटी सोलने पीसीएम परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान, तर पीसीबी गट परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान घेतली होती. आज तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होऊ शकते. ही यादी तुम्हाला fe2025.mahacet.org वर ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाईल. महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय उमेदवारांसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या यादीत BE/BTech आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कार्यक्रमांच्या प्रवेशांचा समावेश असेल. समुपदेशन प्रक्रियेसाठी नोंदणी केलेले उमेदवार fe2025.mahacet.org या अधिकृत MAHACET वेबसाइटला भेट देऊन गुणवत्ता यादी पाहू शकतात.
या तारखेच्या आत नोंदवू शकतात आक्षेप
उमेदवार १९ जुलै ते २१ जुलै २०२५ दरम्यान त्यांच्या खात्यात लॉग इन करून MHT CET २०२५ तात्पुरती गुणवत्ता यादीतील विसंगतींबद्दल तक्रारी सादर करू शकतील. संबंधित अर्ज दुरुस्तीसाठी उमेदवारांच्या लॉगिन पोर्टलवर परत केले जातील.
MHT CET Provisional Merit List 2025 गुणवत्ता यादी: कशी तपासायची?
- स्टेप १: सर्वप्रथम तुम्ही अधिकृत MAHACET वेबसाइट: fe2025.mahacet.org वर जा.
- स्टेप २: होमपेजवर, MHT CET प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट २०२५ साठी लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३: हे तुम्हाला लॉगिन पेजवर पुनर्निर्देशित करेल-पुढे जाण्यासाठी तुमचे क्रेडेन्शियल्स एंटर करा.
- स्टेप ४: गुणवत्ता यादी पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
- स्टेप ५: स्क्रिनवर दिसणारी गुणवत्ता यादी नीट तपासा आणि ती पुढील कामांसाठी डाउनलोड करा.
- स्टेप ६: हार्ड कॉपी प्रिंटी तुम्ही घेऊ शकता आणि सुरक्षित ठेवू शकता.
कशी तयार होते गुणवत्ता यादी
MHT CET २०२५ गुणवत्ता यादी उमेदवारांच्या प्रवेश परीक्षेतील कामगिरी, महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधील BE आणि BTech जागांची उपलब्धता आणि समुपदेशन प्रक्रियेदरम्यान भरलेल्या पसंतींवर आधारित तयार केली जाईल.
PCM ग्रुपसाठी किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
महाराष्ट्र MHT CET 2025 परीक्षेला एकूण ७,६५,३३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६,७५,६०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटासाठी ४६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. PCM गटातील ४२२,८६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.












Click it and Unblock the Notifications