MHADA च्या घरांसाठी तयार राहा! येथे 5 हजार 285 घरांसाठी लाॅटरी, 77 प्लाॅट, अर्जाची तारीख जाणून घ्या
MHADA Konkan Lottery 2025 announced 5285 flats and 77 plots : 'म्हाडा'ने आणखी एक गुड न्यूज दिली आहे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकनंतर आता कोकण मंडळात ठाणे शहर आणि जिल्हा तसेच वसई (पालघर) येथील विविध योजनेंतर्गत ५ हजार २८५ घरांसाठी लाॅटरी जाहीर केली आहे. ओरोस (सिंधुदुर्ग) कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठीही सोडत जाहीर करण्यात आली आहे.

कधीपासून अर्ज नोंदणी होणार?
सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो-लाइव्ह कार्यक्रमांतर्गत १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता हस्ते होणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया करता येणार आहे.
कशी आहे कोकणची लाॅटरी?
- कोकणची लाॅटरी पाच प्रकारात आहे. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५६५ सदनिका
- १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३ हजार २ सदनिका
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेंतर्गत १ हजार ६७७ सदनिका
- कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० % परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी आहेत.
- कोकण मंडळात ७७ भूखंड विक्रीसाठी आहेत.
कोकण, ठाण्यात घर हवंय तर हे वेळापत्रक लक्षात ठेवा
- कोकण मंडळातील घरांसाठी आणि भुंखडांसाठी १३ ऑगस्ट रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- कोकण मंडळातील घरांसाठी आणि भुंखडांसाठी १४ ऑगस्ट रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील.
- २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल.
- ३ सप्टेंबर : सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाईल.
- सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच पात्र ठरविले जातील,अपुर्ण अर्ज असतील तर ते बाद होऊ शकतात.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वर्ष २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७ सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं असून त्यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, नाशिकसाठी ११ ऑगस्ट अंतीम तारीख
म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हा, बीड व नाशिक शहरामधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ४१८ निवासी सदनिका व भूखंडांच्या ऑनलाइन संगणकीय सोडतीद्वारे विक्रीकरिता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरु आहे. अंतीम दिनांक ११ जुलै हा आहे.
छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १ हजार १४८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ३९ सदनिका/भूखंडांचा समावेश आहे. तसेच नाशिक मंडळातील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ६३ सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ०४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता ११४८ सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता २६६ सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता ०४ सदनिकांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications