Marathi Language Day 2025 : मराठी भाषा किती जुनी; किती लोक बोलतात? जाणून घ्या 3 मुद्द्यांत इतिहास
Marathi Language Day 2025 : आज मराठी राजभाषा दिवस आहे, मराठी ही कोट्यवधी लोकांची मायबोली आहे. जगात मराठीचा अनेकदा गौरव झाला. या भाषेचा गौरव करावा तितका कमीच. जगात कोणतीही एवढी मोठी भाषा नसेल जी भाषा बोलणारे एवढे संतांचा जन्म झाला असेल. संतसाहित्यही या भाषेत विपूल लिहिलेले आहे. मराठी ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. मग चर्चा होते की, ही भाषा किती जुनी, किती लोक ही भाषा बोलतात, चला जाणून घ्या तीन मुद्द्यांत इतिहास आणि इतर डिटेल्स.

मराठी भाषा किती जुनी?
1. 14 कोटींपेक्षा अधिक लोकांची मातृभाषा मराठी
2011 च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे 14 कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे 2400 वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे.
2. मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलले मुद्दे
- इसवी सनापूर्वी 207 या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
- गाथा सप्तशती हा 700 श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाआधी किमान 300 वर्षे अस्तित्वात असली पाहिजे.
- ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
3. काय म्हणते अभिजात दर्जासाठी स्थापन केलेली समिती?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने असा दावा केला आहे की मराठी किमान 2,300 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान 80 हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.
अखेर मिळाला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही अनेक काळाची मागणी केंद्र सरकारने पुर्ण केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केले आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही काढण्यात आला आहे.
मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास
विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा अभिमान दिन साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रजा म्हणूनही ओळखले जाते. ज्यांनी मराठी भाषा समृद्ध आणि संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि भाषेचा गौरव करण्यासाठी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून निवडण्यात आला.
मराठी भाषा किती लोक बोलतात?
मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे आणि जगभरातील 83 दशलक्षाहून अधिक लोक बोलतात. त्याचा एक मोठा आणि समृद्ध इतिहास आहे, जो इसवी सन 10व्या शतकापर्यंत पसरलेला आहे आणि संस्कृत, प्राकृत आणि इतर भाषांच्या अद्वितीय मिश्रणासाठी ओळखला जातो. भाषेमध्ये कविता, गद्य, नाटक आणि इतर विविध प्रकारांचा समावेश असलेली एक विशाल आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक परंपरा आहे.












Click it and Unblock the Notifications