लक्ष्मण हाकेंची 70 मतदारसंघात भुमिका ठरली! 35 ठिकाणी सपोर्ट, जरांगेंनी निवडणुकीतून पळ काढल्याची टीका
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टोला लगावला आहे. आमचं 70 मतदारसंघात भूमिका ठरली असून तीस ते पस्तीस जागांवर आम्ही पाठींबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
70 जागांवर उमेदवार पाडणार का?
लक्ष्मण हाके म्हणाले, मराठवाड्यातील सात ते आठ उमदवार हे ओबीसी ठरवणार आहेत. लोकसभेला केलेली चूक विधानसभेला होणार नाही आणि जर या आठ जिल्ह्यात मराठवाडा किंवा महाराष्ट्रात लोकसभेला केलेली चूक जर पुन्हा केली तर 2024 नंतर ओबीसीचे आरक्षण संपलेलं असेल.

सर्वसमावेशक भूमिका असलेल्यांची यादी तयार
लक्ष्मण हाके म्हणाले, आता आमच्या सत्तर जागांवर भूमिका ठरली आहे आणि जवळजवळ तीस ते पस्तीस जागांवर आम्ही पाठिंबा देणार आहोत. फक्त तीनवाजेपर्यंत वाट बघा काही मतदारसंघात आमचे एकमत होणार आहेत. काही मतदारसंघात आमचे तीन ते चार उमेदवार आहेत. आम्हाला सर्वसमावेशक भूमिका असलेल्यांची यादी तयार होईल आज संध्याकाळी नाहीतर उद्या दुपारपर्यंत मी वेळ मागितला आहे.
ओबीसी उमेदवाराच्यामागे भक्कम राहणार
लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसीचे उमेदवार जे निवडून येणारे आहेत जे कुठल्याही पक्षाचे असो त्यांना आमचा पाठींबा राहणार आहे. माझ्याकडे यादी तयार आहे. आम्ही निवडणुकीतून माघार घेणार नाही. आमचे पाठींबा असलेले उमेदवार लातूर शहर, जत, सांगोला,मुखेड आणि मानचे आहेत. ते कुठल्याही पक्षांचे असो पण ते ओबीसी उमेदवार असतील.
पवारांच्या ओबीसी उमेदवारांना पाठींबा
लक्ष्मण हाके म्हणाले, आम्ही शरद पवारांच्या उमेदवारांनाही पाठींबा देणार आहोत पण आमची अट असेल की, ओबीसी आरक्षणाच्या संविधानात्मक चौकटीला धक्का लावणार नसेल तर आमचा त्यांना पाठींबा असेल आम्ही त्यांची सभाही घेऊ पण त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरुन जर ते काळंबेरं करायला उभे राहीले असतील तर आम्ही त्यांच्या उमेदवारांना पाडा असेही म्हणू.
.. तर ओबीसी उमेदवार लेखी देत असल्यास त्यांना सपोर्ट करु
लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगे पाटील यांना मी शिलालेखावरती लिहून घ्या असं सांगितलं होतं. त्यामुळे बाँडपेपर सोडा आम्हाला कळतंय की कुणाची निती किती साफ आहे. शरद पवारांचा एखादा ओबीसी उमेदवार असेल आणि तो जर आम्हाला लेखी देत असतील तर आम्ही त्यांना सपोर्ट करु.
लक्ष्मण हाके म्हणाले, अशोक चव्हाण जोपर्यंत जाहीर भूमिका घेणार नाही तोपर्यंत आम्ही भोकर मतदारसंघात जावून त्यांचा उमेदवार पाडणार आहे. औसा आणि भोकरमध्ये आम्ही उमेदवार पाडणार आहे. परतूर मंठा येथील उमेदवार महाविकास आघाडीचा थोडीच आहे पण मी त्यांच्याबाजूने सभा घेतली आहे. जो माणूस आमच्या ओबीसी आरक्षणाच्या संविधानिक चौकटीआधारे बोलेल त्यांना आमचा पाठींबा असेल.
लक्ष्मण हाके म्हणाले, मी पळ काढणारा नाही, माझ्याकडे उमेदवारांची यादी आहे. तीन वाजेपर्यंत वाट पाहा मी यादी जाहीर करेल. आमची भूमिका ओबीसींच्या हक्कांसाठी आहे. दोनशे विधानसभा मतदारसंघात दोन लाखांहून संख्या ओबीसी आणि भटक्या विमु्क्त जातीजमातींची आहे पण महाराष्ट्रात पंचवीसपेक्षा जास्त उमेदवार सत्ताधारी पार्टीने दिलेले नाही.ही गोष्ट आम्ही महाराष्ट्रातील ओबीसींना समजावून सांगू.












Click it and Unblock the Notifications