Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मराठा समाजास त्रास देणाऱ्यांना पाडा; येवल्यात जाऊन जरांगेंचा भुजबळ काका-पुतण्यास इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघात जाऊन सभा घेतली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विरोध करणाऱ्या दोघांना निवडणुकीत पाडा असे आवाहन केले. यावेळी त्यांनी मात्र कुणाचे नाव घेतले नसले तरी छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय प्रचाराला वेग आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यात त्यांनी इथे दोघांना पाडा असे आवाहन केले.

Maharashtra Assembly Election 2024

भुजबळ काका पुतण्याला कुणाचे आव्हान?

छगन भुजबळ हे येवला - लासलगाव मतदारसंघातून मैदानात आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांनी आव्हान दिले. तर समीर भुजबळ हे नांदगाव - मनमाड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सुहास कांदे व ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्याशी आहे. या तिरंगी लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

ही माझी येवल्याला सांत्वनपर भेट

मनोज जरांगे म्हणाले की, येवल्याला ही माझी सांत्वनपर भेट आहे. हे गाव आता आमच्या रस्त्यात आले. त्याला आता मी बाजूला सारू का. मी इथे कुणाला पाडायचे हे सांगण्यास आलो नाही. पण येथील मतदारांनी मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडावे. आता त्यामुळे कुणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष?

मी ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करू शकतो

येवल्यात विशेष असे काहीच नाही. हा मतदारसंघ काही राज्याबाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. मी ठरवले की डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. पण तो ही सारखा सारखा बिघडत आहे, असे ते म्हणाले.

आंतरवालीत करणार सामूहिक उपोषण

उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांचे येवल्याच्या अंदरसूल येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी तेथील मराठा बांधवांची मोठी गर्दी उसळली होती. जरांगे यांनी यावेळी राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आंतरवाली सराटीत सामूहिक उपोषण सुरू करण्याचाही इशारा दिला. त्यासाठी मराठा समाजाच्या नागरिकांना त्यांनी मोठ्या संख्येने आंतरवालीत येण्याचे आवाहन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+