सर्वात मोठी बातमी ! रमी खेळण भोवलं, कोकाटेंकडे आता क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळताना दिसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. आता हे खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे. या बदल्यात भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांना देण्यात आले आहे.

अधिवेशनादरम्यान आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात कोकाटे सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना दिसत होते. या घटनेनंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र, सरकारने कोकाटे यांचा राजीनामा न घेता केवळ त्यांच्या खात्यात बदल करण्याचा निर्णय घेतला.
या घटनेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी व्यंगात्मक टीका करत म्हटले की, आता रमीला राज्याचा अधिकृत खेळाचा दर्जा द्या आणि मंत्र्यांना सभागृहात पत्ते खेळण्याची परवानगी द्या.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे, तर राजू शेट्टी यांनी कोकाटे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय महाराष्ट्राचे समाधान होणार नाही, असे म्हटले आहे. यापूर्वीही कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती, ज्यामुळे ते टीकेचे धनी ठरले होते. मात्र, आता पुन्हा एकदा केवळ खातेबदल करून सरकारने त्यांच्यावर कारवाई टळल्याची चर्चा सुरू आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications