मोठी राजकीय बातमी: मंगेश चिवटे पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत?

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर, दीड वर्षांनी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचीही रणनीती आतापासूनच आखली जात आहे.

mangesh chivate mla


नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शिक्षकांनी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. या आंदोलनात शासन आणि शिक्षक यांच्यातील दुवा म्हणून काम केलेले मंगेश चिवटे यांचे नाव शिक्षक आमदारकीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसते आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा अवधी असला तरी, पाचही जिल्ह्यांतील इच्छुकांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे असून, महायुतीत भाजपकडे आहे. मात्र, या जागेवर शिवसेना (शिंदे गट) दावा सांगण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

गेल्या निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत तासगावकर यांनी अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होते. सध्याच्या परिस्थितीत तरी महाविकास आघाडीकडून जयंत तासगावकर हेच उमेदवार असतील असे चित्र आहे. परंतु, महायुतीकडून नेमके कोणत्या पक्षाचा उमेदवार शिक्षक मतदारसंघातून उतरणार, याची चर्चा पाचही जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे.

मंगेश चिवटे यांची दावेदारी आणि महायुतीतील पेच

पुणे शिक्षक मतदारसंघ हा पारंपरिकरित्या भाजपचा असल्याचा दावा केला जातो. मात्र, याच ठिकाणाहून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने महायुतीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघ कोणत्या पक्षाला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जयंत तासगावकर, मंगेश चिवटे यांच्यासह विजयसिंह माने आणि दत्तात्रय सावंत हे देखील शिक्षक आमदार होण्याच्या इच्छुक यादीत आहेत. या सर्वांनीच पुणे-मुंबई-पुणे वाऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठांनी कोणालाही तयारीला लागण्याचे स्पष्ट आदेश दिलेले नाहीत.

कोण आहेत मंगेश चिवटे?

मंगेश चिवटे हे शिवसेना (शिंदे गट) मधील एक तरुण आणि सक्रिय नेते असून, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाते. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे असलेले मंगेश चिवटे यांनी पत्रकारितेतून मुंबईत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. शिवसेना अखंड असताना, शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली होती. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे मोठे नाव असून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या उभारणीची संकल्पना देखील त्यांनीच मांडली होती. सध्या ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+