Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Makar Sankranti 2026 wishes : मकरसंक्रांतीनिमित्त तीळ-गुळासारख्या गोड मित्रांसाठी खास शुभेच्छा संदेश

Makar sankranti 2026 wishes for friends marathi : मकर संक्रांत म्हणजे केवळ ऋतू बदल नव्हे, तर नात्यांमधील दुरावा संपवून पुन्हा एकदा गोडवा निर्माण करण्याचा सण. थंडीच्या दिवसात तीळ-गुळाचा ऊबदारपणा आणि पतंगासारखी उंच भरारी घेण्याची जिद्द हा सण आपल्याला देतो. आपल्या आयुष्यातील खास मित्र-मैत्रिणी, जे आपल्या सुख-दुखात सोबत असतात, त्यांना शुभेच्छा देऊन हा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास संदेश देत आहोत.

Makar Sankranti 2026 wishes

मित्र-मैत्रिणींसाठी २० खास मकर संक्रांत शुभेच्छा संदेश

  • १. "तीळ-गूळ घ्या आणि गोड-गोड बोला... मकर संक्रांतीच्या तुला आणि तुझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!"
  • २. "मैत्री आपली तिळासारखी आणि प्रेम आपलं गुळासारखं... संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!"
  • ३. "आकाशात उंच जाणाऱ्या पतंगासारखी तुझ्या यशाची भरारी असू दे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!"
  • ४. "तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा, तुझ्या आयुष्यात येवो आनंदाचा नवा ओलावा. हॅपी संक्रांत!"
  • ५. "जुन्या आठवणींचे हेवेदावे विसरूया, तीळ-गूळ खाऊन नात्यात गोडवा भरूया. संक्रांतीच्या शुभेच्छा!"
  • ६. "तुझ्या आयुष्यात दुखाची काट नसो, सुखाचे पतंग मात्र नेहमी उंच उडो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सखी!"
  • ७. "गोड गोड शब्दांनी सजवूया मैत्रीचा हा सण, तीळ-गुळासारखं जपूया एकमेकांचं मन. शुभेच्छा!"
  • ८. "मकर संक्रांतीचा हा सूर्य तुझ्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट घेऊन येवो. खूप खूप शुभेच्छा!"
  • ९. "मैत्रीत कधी भांडण तर कधी गोडवा, संक्रांतीच्या दिवशी हाच स्नेह हवा. हॅपी मकर संक्रांत!"
  • १०. "पतंग उडवूया आनंदाने, सण साजरा करूया प्रेमाने. संक्रांतीच्या शुभेच्छा मित्रा!"
  • ११. "लुटूया वाण प्रेमाचे, जपूया नाते मैत्रीचे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!"
  • १२. "यशाचे पतंग उंच नभी जावो, आनंदाचे तीळ-गूळ तुझ्या घरी येवो. शुभेच्छा!"
  • १३. "संक्रांतीची ही पहाट तुझ्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो. हॅपी संक्रांत!"
  • १४. "मैत्रीचं नातं तिळासारखं घट्ट असावं आणि गुळासारखं नेहमी गोड असावं. शुभेच्छा!"
  • १५. "काटेरी आठवणींचे मांझे कापूया, संक्रांतीच्या शुभेच्छांनी आनंद जपूया!"
  • १६. "आयुष्यात फक्त सुख असावे, दुःखाचे ढग दूर पळावे. मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा!"
  • १७. "मकर संक्रांतीचा सण तुझ्या आयुष्यात नवी ऊर्जा घेऊन येवो. हॅपी मकर संक्रांत!"
  • १८. "गोड बोलूया, गोड राहूया, संक्रांतीचा आनंद सोबत लुटूया. शुभेच्छा!"
  • १९. "सुर्याच्या उत्तरायणासारखी तुझी प्रगतीही उत्तरोत्तर होत राहो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!"
  • २०. "तीळ-गूळ तर फक्त निमित्त आहे, तुझी मैत्री कायम गोड राहावी हीच सदिच्छा आहे!"


हेही वाचा : Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला? जाणून घ्या अचूक तारीख आणि शुभ मुहुर्त

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+