Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला? जाणून घ्या अचूक तारीख आणि शुभ मुहुर्त
Makar Sankranti 2026 14 or 15 January Check Date : हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि सूर्याच्या उपासनेचा सण म्हणजे मकर संक्रांत. २०२६ मध्ये हा सण नक्की कधी साजरा करायचा, यावरून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, पंचांगानुसार मकर संक्रांतीची नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त आता स्पष्ट झाला आहे.

मकर संक्रांत कधी आहे? (Makar Sankranti 2026 Date)
दृक पंचांगानुसार, सूर्य १४ जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल. या दिवशी उत्तरायणाला सुरुवात होते, ज्याला 'देवांचा दिवस' मानले जाते.
शुभ मुहूर्त आणि पुण्यकाळ
- शास्त्रांनुसार, सूर्याच्या मकर संक्रमणापासूनचे १६ तास अत्यंत शुभ मानले जातात. या काळाला 'पुण्यकाळ' म्हणतात.
- मकर संक्रांत पुण्यकाळ: दुपारी ०३:१३ ते संध्याकाळी ०६:१८ पर्यंत.
- मकर संक्रांत महापुण्यकाळ: दुपारी ०३:१३ ते संध्याकाळी ०५:०४ पर्यंत.
- पवित्र स्नान, दानधर्म आणि सूर्यदेवाची पूजा या मुहूर्तावर करणे फलदायी ठरते.
मकर संक्रांतीचे महत्त्व आणि परंपरा
या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. मकर संक्रांतीला 'खिचडी'चा सण असेही म्हटले जाते. या दिवशी खालील गोष्टींना विशेष महत्त्व आहे:
१. पवित्र स्नान
गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचे क्षालन होते असे मानले जाते. २. सूर्य उपासना: सूर्याला अर्घ्य देणे, गायत्री मंत्राचा जप करणे आणि लाल फुले, गहू, सुपारी व तांदूळ अर्पण करण्याची परंपरा आहे. ३. दानधर्म: मकर संक्रांतीला तीळ-गूळ, खिचडी, कपडे आणि अन्नाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. ४. तीळ-गूळ: "तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला" म्हणत स्नेह वाढवण्याचा हा सण आहे. आयुर्वेदानुसार, थंडीच्या दिवसात तीळ आणि गूळ आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.












Click it and Unblock the Notifications