Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला! 'या' दिवशी मतदान, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra ZP Panchayat Samiti Election 2026 : राज्य निवडणूक आयोगाने अखेर रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आज, मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूकांसाठी मतदान होणार आहेत, तर मतमोजणी ७ फेेब्रुवारी रोजी होणार आहे. जाणून घेऊया. संपूर्ण निवडणूक कार्यक्रम...

Maharashtra ZP Panchayat Samiti Election 2026

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि जिल्हे

  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
  • नामनिर्देशन पत्र छानणी : २२ जानेवारी २०२६
  • उमेदवारी माघारीची अंतीम मुदत : २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • अंतीम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप : २७ जानेवारी २०२६ दुपारी साडेतीन वाजेनंतर
  • अंतीम उमेदवारांची यादी : २७ जानेवारी २०२६
  • मतदानाची तारीख : ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत)
  • मतमोजणीची तारीख : ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी दहा वाजेपासून होणार.)

कुठे होणार निवडणूक?

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि परभणी, धाराशीव, लातूर, जालना या १२ जिल्ह्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

दोन मते द्यावी लागणार; प्रक्रिया हायटेक!

निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील मतदारांना दोन मते द्यावी लागतील-एक जिल्हा परिषद सदस्यासाठी आणि दुसरे पंचायत समितीच्या गणासाठी. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे, मात्र महापालिका क्षेत्रातील प्रक्रिया ऑफलाइन असेल.

उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्राचे नियम

राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी: १. नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (Validity) असणे आवश्यक आहे. २. वैधता प्रमाणपत्र नसल्यास, पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पावती जोडणे बंधनकारक आहे. ३. निवडून आल्यानंतर ६ महिन्यांच्या आत मूळ वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अन्यथा निवड रद्द केली जाईल.

मतदारांच्या सुविधेसाठी 'व्होटर मोबाईल ॲप'

मतदार शोधणे सोपे: मतदारांना आपले नाव, प्रभाग आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने अँड्रॉइड मोबाईल ॲप विकसित केले आहे.

पोर्टल सुविधा: आयोगाच्या वेबसाईटवर 'एपिक' (EPIC) नंबर टाकूनही मतदान केंद्राची माहिती घेता येईल.

प्राधान्य: ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आणि लहान मुले असलेल्या मातांना मतदानासाठी रांगेत न उभे राहता प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था असेल.

निवडणुकीची व्याप्ती (आकडेवारी एका नजरेत)

एकूण मतदान केंद्र: २५,४८२

पिंक बूथ: महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी 'पिंक मतदान केंद्र' असतील, जिथे सर्व कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक महिलाच असतील.

मतदान यंत्र (EVM): ५१,५३४ कंट्रोल युनिट आणि १,१०,३२९ पेक्षा जास्त बॅलेट युनिट्सचा वापर होणार.

प्रशासन: १,२८,००० कर्मचारी आणि अधिकारी या प्रक्रियेत तैनात असतील.

या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी आधारभूत मानली जाणार आहे. मतदारांनी आपले नाव यादीत तपासून घ्यावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६: आकडेवारी एका नजरेत

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

१. मतदार संख्या (एकूण २.०९ कोटी)

निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या मोठी असून यामध्ये पुरुष मतदारांचे प्राबल्य दिसून येते:

  • एकूण मतदार: २,०९,००,००० (२.०९ कोटी)
  • पुरुष मतदार: १,०७,००,००० (१.०७ कोटी)
  • महिला मतदार: १,०२,००,००० (१.०२ कोटी)
  • एकूण मतदान केंद्र: २५,४८२

२. जिल्हा परिषद निवडणूक (१२ जिल्हे)

एकूण १२ जिल्हा परिषदांमध्ये ७३१ निवडणूक विभागांमधून तितकेच सदस्य निवडले जाणार आहेत. आरक्षणाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

एकूण जागा (सदस्य): ७३१

  • महिला आरक्षण: ३६९ जागा
  • अनुसूचित जाती (SC): ८३ जागा
  • अनुसूचित जमाती (ST): २५ जागा
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): १०१ जागा

३. पंचायत समिती निवडणूक (१२५ समित्या)

१२५ पंचायत समित्यांच्या अंतर्गत एकूण १,४६२ गणांमधून सदस्य निवडले जातील. त्याचे आरक्षण खालीलप्रमाणे विभागले आहे.

  • एकूण जागा (सदस्य): १,४६२
  • महिला आरक्षण: ७३१ जागा
  • अनुसूचित जाती (SC): १६६ जागा
  • अनुसूचित जमाती (ST): ३८ जागा
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): ३४२ जागा
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+