Maharashtra zp election result झेडपी, पंचायत समित्यांच्या निकालात कोण पुढे? सकाळी 10.45 पर्यंत अपडेट
Maharashtra zp election result 2026 live updates : राज्याचं लक्ष लागून असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलानुसार महायुतीने (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी-अजित पवार) मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. सकाळी १०:४५ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या १७१ जागांच्या कलानुसार भाजपने सर्वाधिक ६१ जागांवर आघाडी घेत आपला दबदबा कायम राखला आहे.

सुरुवातीचे कल (एकूण १७१/७३१ जागा)
पक्षआघाडी/ विजय
- भाजप - ६१
- शिवसेना (शिंदे गट) - ३६
- राष्ट्रवादी (अजित पवार)- ३३
- काँग्रेस - १६
- शिवसेना (ठाकरे गट) - ११
- राष्ट्रवादी (शरद पवार) - ०२
- इतर/अपक्ष - १२
ठळक घडामोडी: कुठे कुणाचा डंका?
- सांगोला: शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वात सांगोल्यात शिवसेनेने विजयी सलामी दिली आहे.
- छत्रपती संभाजीनगर: अजिंठा गटात शिवसेनेचा विजय झाला असून आयशा बेगम विजयी झाल्या आहेत.
- लातूर: पानगावमध्ये मनसेचा उमेदवार आघाडीवर आहे.
- सोलापूर: म्हाढा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) पहिला विजय झाला आहे. तसेच भाजप आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आघाडीवर आहेत.
- कोल्हापूर: कोल्हापुरात काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. घुणकी मतदारसंघात काँग्रेसच्या शुभांगी कुंभार विजयी झाल्या आहेत.
महाविकास आघाडीला धक्का, शरद पवार गट पिछाडीवर
या निवडणुकीत सर्वात धक्कादायक कल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाने काही ठिकाणी झुंज दिली असली, तरी शरद पवारांचा पक्ष केवळ २ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे बहुमताच्या दिशेने कूच केली आहे.
कोकणात अपक्षांचे आव्हान
रत्नागिरीमध्ये राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेत प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे.
आतापर्यंतच्या कलानुसार भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीला महायुतीचा 'डंका' रोखण्यात अपयश येताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications