Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्राला मिळणार 4 नव्या वंदे भारत ट्रेन! कुठून कुठे धावणार, कोणत्या स्टेशन्सवर थांबणार? वाचा

Maharashtra will get 4 new Vande Bharat trains : महाराष्ट्रातील रेल्वेप्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी असून खासकरुन पुण्यातील लोकांना तर रेल्वेने दिलं आहे. कारण एक- दोन नव्हे तर तब्बल चार वंदे भारत ट्रेन पुण्यातून धावणार आहेत. जरी या ट्रेन पुण्यातून धावणार असल्या तरीही त्याचा फायदा महाराष्ट्रातील इतर शहरांना मिळणार आहे. पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन गुजरात, तेलंगणा, कर्नाटक राज्यात धावणार आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, पुण्याहून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येत आहेत यापैकी शेगाव वडोदरा सिकंदराबाद आणि बेळगाव पर्यंत या ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे आता फक्त पुणे स्थानकातून प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ट्रेनची संख्या सहावर पोहोचली आहे.

Vande Bharat trains

पुण्याहून यापूर्वी पुणे - कोल्हापूर आणि पुणे - हुबळी अशा दोन मार्गावर वंदे भारत ट्रेन धावतात आता आणखी चार नव्या ट्रेन सुरू केल्यामुळे एकट्या पुण्यातून सहा वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.

पुण्याहून कोणत्या शहरात धावणार ट्रेन, कसा असेल मार्ग

  1. पुणे ते शेगाव ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पुणे-दौंड -अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर-जालना या बस स्थानकावर थांबेल आणि पुढे ती शेगावला जाईल.
  2. पुणे वडोदरा ही दुसरी वंदे भारत ट्रेन पुणे- लोणावळा-पनवेल -वापी-सुरत या चार स्थानकावर थांबेल.
  3. पुणे ते सिकंदराबाद ही तिसरी वंदे भारत ट्रेन पुणे - दौंड-सोलापूर-गुलबर्गा या स्थानकावर थांबणार आहे.
  4. पुणे ते बेळगाव ही चौथी वंदे भारत ट्रेन सातारा-सांगली-मिरज या रेल्वे स्थानकावर थांबेल अशी माहिती आहे.

भारतातील वंदे भारत ट्रेनची संख्या किती?

मीडिया रिपोर्टनुसार 2024 मध्ये भारतीय रेल्वेने 30 पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस होत्या. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या. 2024 अखेरपर्यंत देशातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 136 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात किती आहेत वंदे भारत ट्रेन?

महाराष्ट्रात आजपर्यंत 11 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
गेल्या वर्षी देशात 10 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या, त्यात महाराष्ट्राला सुद्धा तीन गाड्या मिळाल्या होत्या.

महाराष्ट्रातून सध्या या मार्गावर धावतात वंदे भारत ट्रेन

20 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्रात सीएसएमटी (मुंबई) ते जालना -(आता सीएसएमटी ते नांदेड), सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या अकरा मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+