विदर्भात तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस होणार, पुण्यातही बरसणार सरी, महाराष्ट्रात कसे असेल हवामान? वाचा
Maharashtra Weather Vidarbha will experience thundershowers 3 day : राज्यात आज 31 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर आजपासून विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यादरम्यान मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

आजपासून विदर्भात तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस
काल रायगड, रत्नागिरी जिल्हे तसेच पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात मुसळधार पाऊस झाला. तर आजपासून पुढील दोन ते तीन दिवस नागपूर, गोंदिया जिल्ह्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
Heavy rainfall at very likely to occur at isolated places in the districts of Konkan - Goa and Ghat areas of Madhya Maharashtra
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 30, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या." pic.twitter.com/FyxLEavr4e
कोकणात सोसाट्याचा वारा वाहणार
कोकण किनारपट्टी भागात आजपासून पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि आसपासचा परिसर
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते अति हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन तीन दिवसांत पावसाची तिव्रता कमी होऊन आकाश अंशतः ढगाळ राहील आणि दुपारी किंवा सायंकाळी सामान्यतः अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज 31 जुलैला कसे राहील हवामान?
कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.
उद्या 1 ऑगस्ट रोजी कसे राहील हवामान?
कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशा अंदाज पुणे व्यक्त केला आहे.












Click it and Unblock the Notifications