Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात अवकाळी पाऊस कोसळणार, 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

maharashtra weather update : राज्यात मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरे केला जात आहे. फटाके फोडले जातायत. तर दुसरीकडे आता हिवाळ्याची ही चाहुल लागलीय. मात्र थंडीची आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

maharashtra weather update

यंदा पावसानं राज्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, परतीच्या पावासानं अनेक जिल्ह्यात शेतक-याचं मोठं नुकसान केलं आहे. परतीचा पाऊस आणखी काही दिवस हजेरी लावणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आणखी काही दिवस परतीच्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकण विभागासाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर हिटचा तडाका सहन केल्यानंतर लोकांना आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. नोव्हेंबरमध्येही उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे थंडी पडली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात थंडीचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परतीच्या पावसामुळे ढगाळ वातावरण असल्याने थंडी नाही. या वातावरणाचा प्रभाव कमी झाल्यास थंडीचा लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+