Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात आज 'या' भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार! जाणून घ्या विभागनिहाय पावसाची स्थिती

Maharashtra Weather today : राज्यात पावसाचा जोर सुरुच असून बहुतांश भाग ओलेचिंब झाले आहे, रानही भिजले असून आता पाण्याने रस्तेही भरले आहेत. काल राज्यात पावसाने सुखावल्यानंर आजही काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. आज १० जुलै रोजी कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Maharashtra Weather today

भंडारा गोंदिया नागपूर येथे तुरळ ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. काल तेथे जोरदार पाऊस झाला. पुराच्या पाण्यात काही गावे वेढली तर काही ठिकाणी रस्तेही बंद झाले होते. दरम्यान, काल अमरावती चंद्रपूर गडचिरोली वर्धा येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला काल या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.

दरम्यान, ९ जुलै रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाट विभाग पुणे घाट विभाग कोल्हापूर घाट विभाग व साताराच्या गाडी विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यानंतर तिथे पावसाचे आगमन झाले तर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ येथे काल तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

आज १० जुलैला या जिल्ह्यांना रेड अलर्ट

१० जुलै रोजी भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

घाट, विभागात मुसळधार पाऊस होणार

  • आज १० जुलै रोजी रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • अकोला अमरावती बुलढाणा, वाशिम यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

येलो अलर्ट

वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

पुणे आणि परिसरात कसे राहील हवामान

पुणे व आसपासच्या परिसरात हवामान पाहता, आजपासून पुढील पाच दिवस आकाश सामान्यतः राहून अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+