Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात पुढचे 72 तास खूपच महत्वाचे! 'या' जिल्ह्यांत होणार अतीवृष्टी, कुठे कसा पाऊस पडेल? वाचा

Maharashtra Weather Today Heavy Rainfall : पुढील तीन चार दिवस कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील 72 तास महाराष्ट्राच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहेत. राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather

या जिल्ह्यांना रेड अलर्ट

आज दिनांक 24 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तसेच दिनांक 24 आणि 25 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी व पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची तसंच तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल 23 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा आणि पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस झाला.

पालघर, मुंबई ठाणे, नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट

आज दिनांक 24 जुलै रोजी पालघर, मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात तर दिनांक 25 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात आणि दिनांक 26 जुलै रोजी रायगड रत्नागिरी जिल्हा आणि पुणे, सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट

विदर्भामध्ये दिनांक 25 आणि 26 जुलै रोजी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.

उर्वरित राज्यासह काय असेल स्थिती

राज्यात उर्वरित ठिकाणी पुढील दोन-तीन दिवस तुरळ ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व संबंधित ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात स्थिती काय?

पुणे आणि आसपासच्या परिसरात आज 24 जुलै आकाश सामान्य राहील. तसेच हलक्या ते अती हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर दोन तीन दिवस तीव्रता वाढणार असून आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. घाट क्षेत्रासाठी 24 आणि 25 जुलैला काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची तसंच अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे आज आणि उद्या घाट विभागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+