Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उन्हाळा संपल्यातच जमा! 22 मे पर्यंत विजांच्या कडकडाटांसह पाऊस होणार! आज कुठे बरसणार सरी वाचा

Maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस परतीची शक्यता कमीच आहे. ऐन मे महिन्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस पडत होता. यात आता आणखी भर पडली असून येत्या 22 मे पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला, कोकण गोव्यात तुरळक टिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचिंत वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि कोकण व गोव्यातील तुरळक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय किंचित घट झाली आहे.महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता असून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra weather

आज कुठे पडणार पाऊस?

आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह संपूर्ण विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येलो अलर्ट हवामान विभागने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यातील इतर भागात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलले आहे. राज्यात ढगाळ वातावरण असून या मे महिन्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणच जास्त आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळा सुरु झाला आहे. आगामी २२ मे पर्यंत पावसाची स्थिती राहणार आहे. या काळात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

राज्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमान ४१ अंश सेल्सियस चंद्रपूर येथे नोंदवले गेले.

मुंबई (कुलाबा) ३४.४. सांताक्रूझ ३४.४, अलिबाग ३६.१, रत्नागिरी ३४.६, पणजी (गोवा) ३५.०. डहाणू ३५.७, पुणे ३५.६, लोहगाव ३७.७, अहिल्यानगर ३४.०. जळगाव ३७.५, कोल्हापूर ३३.५. महाबळेश्वर २६.८, मालेगाव ३४.२, नाशिक ३२.३, सांगली ३४.६, सातारा ३४.६, सोलापूर ३७.४, धाराशिव ३५.१. छत्रपती संभाजीनगर ३५.२. परभणी ३७.४, नांदेड बीड ३५.९, अकोला ३८.५. अमरावती ३८.४. बुलढाणा ३५.०, ब्रह्मपुरी ४०.५. चंद्रपूर ४१.०, गोंदिया ३८.४. नागपूर ३७.५, वाशिम ३७.४. वर्धा ३७.०, यवतमाळ ३७.४.

हेही वाचा : Maharashtra Weather update : ऐन उन्हाळ्यात राज्यात अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट

हेही वाचा : Weather Update : राज्यात 'या’ भागात वादळी पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यातील अंदाज काय?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+