Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather update : ऐन उन्हाळ्यात राज्यात अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather update : महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात बेमौसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात अवकाळी पावसाचे संकट राज्यावर घोंगावत असून महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून ऐन उन्हाळ्यात गारवा जाणवत आहे. रात्रीच्या तापमानात घट झाली असून अवकाळी पावसाने काही ठिकाणी गेल्या काही दिवसांत राज्यातील जिल्ह्यांना तडाखा बसला आहे.

Maharashtra Weather update

दरम्यान, पुन्हा हवामान विभागाने 20 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-अरबी समुद्रापासून कोकण, उत्तर महाराष्ट्र ते मध्यप्रदेशात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा प्रभाव मराठवाडा, कर्नाटक आणि दक्षिणेतील काही भागांना पावसासाठी आवश्यक वातारवण तयार झाले असून बेमौसमी पाऊस यादरम्यान पडू शकतो.

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला?

मराठवाडा

हवामान विभागाच्या अहवालानुसार, आज मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर, धुळे येथे पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ

विदर्भात आज नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदीया, चंद्रपूर येथे पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो तसेच वादळी वारा घोंगावणार आहे.

ठळक घडामोडी

  • एक कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य अरबी समुद्रापासून वायव्य मध्य प्रदेशपर्यंत (उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र मार्गे) जात आहे.
  • एक कमी दाबाचा प‌ट्टा पूर्व उत्तर प्रदेशपासून आग्नेय तेलंगणापर्यंत (पूर्व मध्य प्रदेश व विदर्भ मार्गे) जात आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान

  • मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
  • कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
  • मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
  • मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट
  • मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट
  • कोंकण गोव्यात बर्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) ३२.२, सांताक्रूझ ३३.३, अलिबाग ३३.९, रत्नागिरी ३२.५. पणजी (गोवा) ३५.२. डहाणू ३३.३. पुणे ३२.८. लोहगाव ३६.४, अहिल्यानगर, जळगाव ३६.५. कोल्हापूर ३४.१. महाबळेश्वर २४.५. मालेगाव ३५.६, नाशिक ३३.२, सांगली ३५.६, सातारा ३२.२. सोलापूर ३८.३. धाराशिव ३७.४, छत्रपती संभाजीनगर ३५.६, परभणी ३८.५. नांदेड, बीड ३७.५, अकोला ३९.२, अमरावती ३८.४, बुलढाणा ३६.२. ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ४०.०, गोंदिया ३७.७. नागपूर ४०.६, वाशिम ३८.२. वर्धा ३९.५, यवतमाळ ३९.२.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+