Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather :या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार! मुंबई-पुण्यात पावसाची आज स्थिती काय? जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यात हळूहळू पावसाचा जोर वाढत असून कालपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. आज उद्या कोकण,गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसंच विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

काल दिनांक 21 जुलैला ठाणे मुंबई रायगड येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचे दिवस सुरु झाले आहेत.

Maharashtra Weather

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

आज पुणे, कोल्हापूर व कोल्हापूरच्या घाट विभागात तसंच सातारा, सांगली, मराठवाडा, मराठवाड्याच्या व विदर्भाचा बऱ्याच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आज २२ जुलैला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व कोल्हापूरचा घाट विभागात जोरदार ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई ठाण्यात पावसाची स्थिती काय

पालघर, ठाणे, मुंबई व मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

पुण्यात कसे राहील हवामान

पुणे व परिसरात पुढील तीन दिवस आकाश सामान्य ण्याची आहे व अति हलका ते हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे असं पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

कोकण

22 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यादरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची कोकणात शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र

22 जुलै रोजी म्हणजेच उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाडा - विदर्भ

22 जुलै रोजी मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 22 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाटही काही ठिकाणी होण्याची शक्यता विदर्भात पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+