पुण्यात हायअलर्ट! मराठवाडा-विदर्भात मध्यम -जोरदार पावसाची शक्यता, कुठे कसा पाऊस पडणार जाणून घ्या
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाच्या सरींची बरसात सुरुच असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाची आज शक्यता आहे. पु्णे आणि साताऱ्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाडा, विदर्भातही मध्यम पावसाची शक्यता आहे.

कुठे कसा पडणार पाऊस
कोकण - येलो अलर्ट
- कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
- काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
- रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट.
पश्चिम महाराष्ट्र - येलो अलर्ट
- पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज आहे.
- पुण्यात आणि साताऱ्यात मुसळधार सरू कोसळतील.
विदर्भ -
#imdnagpur #VidarbhaWeather #Monsoon2025#RainfallUpdate #IMDNagpur #WeatherAlert#maharashtraweather pic.twitter.com/dhlF15mvlB
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) July 10, 2025
विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर भंडारा गोंदीया येथे आज मध्यम ते हलका पाऊस पडू शकतो. नागपूर, वर्धा येथेही पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा -
मराठवाड्यातील जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथे मध्यम ते हलका पाऊस आज होऊ शकतो,सध्या येथे ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
मुंबईत कशी राहील पावसाची स्थिती
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पश्चिम आणि मध्य उपनगरात आझ सकाळी काही भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. आज दुपारी आणि संध्याकाळी हलक्या पावसाची शक्यता मुंबईत असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह सरी पडू शकतात असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सखल भागांत पाणी साचण्याचा संभव असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे
गेल्या २४ तासांतील पाऊस
मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.
कोकण व गोवा
कर्जत ५. माथेरान ४.६, पणजी ३.८, पनवेल ३.६, म्हसळा ३. उरण २.६. मुरबाड २.६. सावंतवाडी २.२. आवळेगाव २.१. २. दोडामार्ग २. सांगे १.९, खालापूर १.८, कुडाळ १.८. सांताक्रुझ १.८. पोलादपूर १.७. उल्हासनगर १.७. मंडणगड १.६, अंबरनाथ १.५. पेडणे १.४. कणकवली १.३. पाली १.१. चिपळूण १.१. राजापूर १.१. वैभववाडी १.१. देवगड १.१. हर्णे १.१. रत्नागिरी १. म्हापसा १, केपे १.
मध्य महाराष्ट्रः
राधानगरी ९.७, दौंड ६.४. लोणावळा ५.८. महाबळेश्वर ४.६. सुरगाणा ३.८. गगनबावडा ३.४. वेल्हे २.४. चांदगड २.२. इगतपुरी १.९. कोकरूड १.९. दिंडोरी १.८. तळेगाव १.७, पौड १.६, वडगाव १.६. एनडीए पुणे (शहर) १.४.
पाथर्डी १.३. गारगोटी भूदरगड १.२. चिंचवड १.१.
मराठवाडाः
उदगीर २.६, माहूर २.१, किनवट १.८. तुळजापूर १.७, अर्थपूर १.४. उदगीर १.४. देगलूर १.३. सिल्लोड १.
विदर्भ:
पांढरीकवडा ८.४. राळेगाव ७. घाटंजी ६.७, मारेगाव ६.२, कळंब ६.२. झरीझमनी ५.५. माँदा ५.४. यवतमाळ ५.३. राजुरा १.२. बाबुळगाव ५.१. हिंगणघाट ४.९. ताखनी ४.६. कोरपना ४.६. जिवती ४.५. वरोरा ४.४. अर्णी ५.३. सावली ४.२. मूल ४. एटापल्ली ३.५. कुही ३.३. गोंडपिपरी ३.३, भंडारा ३.१, दारव्हा ३.१, चामोर्शी ३.१, देवरी २.७, बल्लारपूर २.६, चिखलदरा २.६, भद्रावती २.५. समुद्रपूर २.५. कोची २.४. वर्धा २.४. दिग्रस २.३, कांप्टी २.३. हिंगणा २.३. चंद्रपूर २.१, नागपूर २, उमरेड २, कळमेश्वर १.९. सावनेर १.९.












Click it and Unblock the Notifications