Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather : थंडी होतेय कमी! आता राज्यात अवकाळीची शक्यता! वाचा इतर ठिकाणचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update : गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून सुरु असलेली थंडीची लाट आता हळूहळू ओसरत आहे. त्यामुळे काहीफार प्रमाणात दिलासा मिळणार असून राज्यातील काही भागावर पावसाचे ढग आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत वातारवरणात बदल होणार आहेत. त्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो.

विदर्भात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 24 आणि 25 डिसेंबरला विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात अवकाळीचेही संकट घोंगावत आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भावर पावसाचे सावट असेल तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आर्द्रतेत वाढ होणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.जम्मू-काश्मीर, हिमाचलमध्ये पुढील तीन दिवस थंडीची लाट कायम

Maharashtra Weather

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात एक दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, ज्यामुळे या प्रदेशात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, हिमाचल प्रदेशात तीव्र थंडीच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीत हलका पाऊस

आज, सोमवार 23 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस झाला. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, झारखंड, बिहारसह अनेक राज्यांमध्ये येत्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचे IMD ने म्हटले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज सकाळी दाट धुके आहे. आज हवामानात विशेष बदल होणार नाही.

महाराष्ट्रात आज कुठे पाऊस पडणार! या जिल्ह्यांत हवामान विभागाचा रेड, ऑरेंज अलर्ट, वाचा ताजे अपडेट्स

उत्तर भारतात थंडीची लाट आणि धुक्याचा इशारा

27 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान उत्तर-पश्चिम भारतात पाऊस पडेल. आणि पश्चिम हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. सध्या, राजस्थानवर कमी उष्णकटिबंधीय स्तरावर चक्रीवादळामुळे अनेक भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. तटीय आंध्र प्रदेश आणि रायलसीमा द्वारे समर्थित 24 ते 26 डिसेंबर या कालावधीत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आजपासून 24 डिसेंबरपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये विखुरलेल्या हिमवर्षाव किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.

maharashtra weather update: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+