maharashtra weather update: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज

maharashtra weather update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने संततधार पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीखाली विविध मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पुण्यातील काही सोसट्यामध्ये अजून पाणी आहे. कालपासून थोडीशी विश्रांती घेतल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

आज रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेज अलर्ट देण्यात आला होता. काल अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. आज मात्र पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Rain

पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मुंबईतही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचाही इशारा हवामान विभागाने दिला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस

राज्यात अजून पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+