विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता, मुंबई पुण्यासह राज्यातील हवामान कसे राहील? घ्या जाणून
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील कोकण गोवा विदर्भ येथे बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा येथे काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी आज 17 जुलै रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत काल जोरदार पावसाचे आगमन झाले होते आजही तेथे काहीअंशी पाऊस पडेल तर पुण्यात आकाश ढगाळ राहील आणि येते पाच दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
राज्यातील कोकणातील रायगड भागात कालपर्यंत पावसाचा मोठा जोर होता पण काल सकाळनंतर हा जोर ओसरला. त्यामुळे तेथील जनजीवन पुन्हा पुर्वपदावर हळूहळू आले. अतीवृष्टीमुळे तेथे सुटीही जाहीर करण्यात आली होती. तर अकोला, नागपूर आणि इतर विदर्भातील जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झालेला आहे.

महाराष्ट्रातील अमरावती, गडचिरोली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह 16 जुलै रोजी पाऊस पडला. यानंतर भंडारा चंद्रपूर गोंदिया, नागपूर येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आज 17 जुलै रोजी नांदेड लातूर धाराशिव येथे तुरळ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकणातील पावसाची स्थिती
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील पावसाची स्थिती
उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भात कसे राहील हवामान
विदर्भात ३० ते ४० किमी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वाशिम यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुण्यात कसे राहील हवामान
पुणे व परिसरात येथे आजपासून पुढील पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून अती हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईतील पावसाची स्थिती
मुंबईत येत्या दोन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, तर आज ढगांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातही हीच स्थिती राहू शकते त्यामुळे पावसात दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications