Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

20 नोव्हेंबरला मतदान! चिंता कशाला? घरबसल्या मतदार ओळखपत्राला असा करा मोबाईल नंबर लिंक, VIDEO

Maharashtra Voting on 20 November Link mobile number to voter ID card : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान आहे, आपला मतदानाचा हक्क बजावण्यासोबतच तुम्हाला मोबाईल नंबर मतदान ओळखपत्राला लिंक करणं हा एक महत्वाचा आणि आवश्यक भाग आहे आज आपण मोबाईल नंबर मतदान ओळखपत्राला कसा लिंक करायचा हे जाणून घेऊया.

मोबाईल नंबर लिंक असल्यास पुन्हा नवीन ओळखपत्र काढायची गरज नाही

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार तसंच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळंच देशातील प्रत्येक नागरिकांसाठी मतदार ओळखपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. फक्त मतदान करण्यासाठीच नाही तर, भारताचा नागरिक म्हणूनही प्रत्येकाकडे मतदान ओळखपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेक शासकीय, खाजगी कागदपत्र काढण्यासाठी देखील मतदान ओळखपत्राची गरज लागते. मतदान ओळखपत्र मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. कारण जर कधी मतदान ओळखपत्र हरवलं तर मोबाईल नंबर लिंक असल्यानं पुन्हा नवीन ओळखपत्र काढण्याची गरज भासणार नाही.

Maharashtra Voting on 20 November Link mobile number to voter ID card

ऑनलाइन डाउनलोड करू शकता

जर कधी मतदान ओळखपत्र हरवलं तर मोबाईल नंबर लिंक असल्याचा मोठा फायदा होतो. पुन्हा नवीन ओळखपत्र काढण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केल्याने मतदान कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन अापडेट करणं खूप सोपं होतं. मतदार ओळखपत्राशी मोबाइल नंबर लिंक करणे अगदी सोपे आहे. घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने मतदान ओळखपत्राशी मोबाइल नंबर लिंक करता येतो. जी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.

मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी हे करा..

नॅशनल वोटर्स सर्व्हिस या वेबसाईटवर लिंकिंगची सुविधा

  • सर्वप्रथम ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस या वेबसाईटला https://www.nvsp.in भेट द्या.
  • त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड व कॅप्चा कोड भरून लॉग इन करा.
  • नवीन युजर असल्यास साइन अप करून मोबाईल नंबर, ईमेल व कॅप्चा कोड टाकून पुढे जा.
  • त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी टाकल्यानंतर समोर नवीन पेज दिसेल.
  • फॉर्ममध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून तो फॉर्म सबमिट करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईल क्रमांक 48 तासांच्या आत मतदार ओळखपत्राशी जोडला जातो.

झटक्यात काम..!

अशाप्रकारे तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र सहजपणे तुमच्या मोबाईल नंबरसोबत लिंक करू शकता. मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केल्याने, मतदार ओळखपत्राबाबत समस्या वारंवार उद्भवत नाहीत. मोबाइल नंबर लिंक केला असल्याने मतदार ओळखपत्र अगदी सहज पुन्हा एकदा प्राप्त करणं शक्य होतं. यासोबतच, मतदार यादीतील माहिती अपडेट करणं आणि त्यात काही बदल करणं सुद्धा यामुळं अधिक सोपं होतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+