Maharashtra SSC Result 2025 : 10वीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी, विभागानिहाय निकाल वाचा
Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा निकाल 94.10 टक्के लागला असून दुपारी एक वाजता निकाल मंडळाच्या वेबसाईटवर पाहता तसेच डाऊनलोड करता येणार आहे.

कोणत्या विभागाचा किती लागला निकाल?
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या मध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असल्याचे पत्रकार परिषदेत बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. सर्वच विभागीय मंडळातून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 96.14 एवढी आहे. तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 92.31 एवढी आहे.
मुलींची उत्तीर्ण टक्केवारी मुलांपेक्षा 3. 83 टक्के एवढी जास्त
यंदाही मुलींनी परिक्षेतील निकालात बाजी मारल्याचे स्पष्ट झाले असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 टक्के एवढी जास्त आहे.
किती विद्यार्थ्यांनी दिली होती परिक्षा
दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 आहे.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
- पुणे : 94.81 टक्के
- नागपूर : 90.78 टक्के
- संभाजीनगर : 92.82 टक्के
- मुंबई : 95.84 टक्के
- कोल्हापूर : 96.78 टक्के
- अमरावती : 92.95 टक्के
- नाशिक : 93.04 टक्के
- लातूर : 92.77 टक्के
- कोकण : 99.82 टक्के
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC) निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाइट्स वापरू शकता :
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
- sscresult.mahahsscboard.in.
निकाल कसा डाऊनलोड करायचा?
महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 2025 तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा आणि तुमचा निकाल तपासा
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर, 'महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025' लिंक तपासा.
- विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.
- विद्यार्थी भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
- हेही वाचा : SSC Result 2025 : दहावीनंतर काय करायचे समजत नाही, या 5 टीप्स वाचा.. तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील
हेही वाचा : SSC Result: 10वीचा निकाल उद्या लागणार, 1 वाजता दिसेल ऑनलाईन, कसा चेक करायचा जाणून घ्या स्टेप
हेही वाचा : SSC Result 2025 : दहावीनंतर काय करायचे समजत नाही, या 5 टीप्स वाचा.. तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील












Click it and Unblock the Notifications