SSC Result: 10वीचा निकाल उद्या लागणार, 1 वाजता दिसेल ऑनलाईन, कसा चेक करायचा जाणून घ्या स्टेप
Maharashtra 10th SSC Result 2025 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) निकालाची तारीख बोर्डाने अखेर आज जाहीर केली आहे.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून पुढील दोन आठवड्यामध्ये निकाल जाहीर होणार असं सांगितलं जात होतं. मात्र त्यापूर्वीच आज विद्यार्थ्यांना आश्चर्याचा दे धक्का देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवार दि. 13 मे 2025 रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहेत.

कधी आणि किती वाजता लागणार निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीनिशी असलेले एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यात "फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षेच्या निकालाबाबत" अशा मथळ्याखाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
"महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे," अशी घोषणा पत्रातून बोर्डाने केली आहे.
कोणत्या संकेतस्थळावर पाहता येणार दहावीचा निकाल?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC) निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाइट्स वापरू शकता :
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
- sscresult.mahahsscboard.in.
निकाल कसा डाऊनलोड करायचा?
महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 2025 तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा.
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर, 'महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025' लिंक तपासा.
- विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.
- विद्यार्थी भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
11 वीचा प्रवेश ऑनलाइनच मिळणार!
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी या कॉलेज ते कॉलेजच्या पायऱ्या चढावा लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची ही गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in याचा वापर पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन देखील बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications