SSC Result 2025 : दहावीनंतर काय करायचे समजत नाही, या 5 टीप्स वाचा.. तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील
SSC Result 2025 10th, 12th Career and Course to Choose Tips for Students : दहावीचा निकाल आज 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. दहावीचा निकाल हाती आला आणि तुम्हाला चांगले गुणही पडले अशावेळी आता दहावी तर झाली पण आता पुढे काय करायचे हेच अनेकांना समजत नाही. मग ऐनवेळी धावाधाव होते आणि एखादा निर्णय चुकला की, त्याचे नुकसान होते.
मुलांना वाटते की, आपण काहीतरी मोठे व्हावे..तसेच पालकही मुलांच्या भविष्याबद्दल जागरुक असतात, दहावी आणि बारावी हे आपल्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी नवे वळण आहे. दहावी तर जीवनाचा पहिला निर्णयक टप्पा असतो अशावेळी दहावीनंतर काय करायचे याचा निर्णय घेऊ शकत नसाल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स देणार आहोत. ज्यामुळे तु्म्हाला दहावीनंतर काय करायचे याच्या वाटा सापडू शकता आणि तुम्ही निर्णय घेऊ शकाल.

1. काय करायचे याचे नियोजन करा
निकाल हाती येताच तुम्ही थोडा शांत विचार करा. कुटुंबियांना सांगा तुम्हाला काय करायचे जर तुम्हाला काय करायचे हे निश्चित नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील नातेवाईक, वरिष्ठांचा, शाळेतील शिक्षकांचाही सल्ला घेऊ शकता. ज्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे ठरवले त्याचे भविष्य काय आहे, कालावधी आणि खर्च याचाही विचार करा. त्यानंतर चांगले काॅलेज कोणते आहे हे आताच शोधून ठेवा.
2. कौशल्यगुणांचा विकास
तुम्हाला पारंपारिक पदविका व नंतर पदवी कोर्सेस करायचे नसेल तर तुम्ही किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमही करु शकता. त्यासाठी काय आवश्यक त्या गोष्टींचा विचार करा. यासह काही वेगळ्या क्षेत्रात जायचे असेल तर त्यासाठी संभाषण कौशल्य आणि अंगीकृत असलेले गुणांचा वापर करा. अभ्यासक्रम पुर्ण करण्याच्या कालावधीत असे काही कोर्सेस करा ज्यामुळे तुमचे कौशल्य आणि ज्ञान वाढेल.
3. तुम्हाला खरंच काय करायचे हे ठरवा
अनेक मुलं आपले घरातील लोक जे करतात तेच करायचे असे म्हणतात, पण ही वेळ तुमची आहे. त्यांचे आणि तुमच्यात काही फरक असेल आणि तुम्हाला वेगळे करायचे असेल तर तुम्ही हे कुटुंबियाच्या सहकार्याने ठरवा.
4. तुमचा सीव्ही तयार ठेवा
जर दहावीनंतर तुम्हाला नोकरीच करायची असेल तर तुम्ही तुमचा सीव्ही तयार करा. तुमच्यापेक्षा तुमचा सीव्ही अर्थात त्याला आपण शैक्षणिक बायोडाटाही म्हणतो तो अपडेट करा तो जास्त बोलतो. कारण हीच तुमच्या करीअरची पहिली पायरी असते जी आयुष्यात पुढे शिक्षणाला की आतापासूुनच करीअरला महत्व द्यायचे हे ठरवावे लागते.
5. कोर्सेस निवडा अन् कागदपत्रे तयार ठेवा
तुम्हाला कोणता कोर्स करायचा हा सल्ला तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे ठरवा, त्यासाठी ज्यांची मदत आवश्यक आहे त्यांची घ्या. एकदा कोर्सची निश्चिती झाली की, तुम्ही मग त्यासाठी काय कागदपत्रे लागतात हे बघून ती काढून ठेवा.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications