Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेल्या शिंदे, फडणवीस, ठाकरे, पटोले, अजित पवार यांची संपत्ती किती

Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकालाला आज सुरुवात झाली. पहिल्या एक तासांत भाजपने आघाडी घेतलेली दिसली. महायुती व महाविकास आघाडीत यावेळी काटे की टक्कर झालेली दिसली. निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाने आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा केली. एकनाथ शिंदे, फडणवीस, उद्धव ठाकरे, नाना पटोले यासारखे काही चेहरे समोर आले. चर्चेत आलेले हे चेहरे किती श्रीमंत आहेत, हेच आपण पाहूयात...

Maharashtra Assembly Election 2024

देवेंद्र फडणवीसांची संपत्ती किती

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झालाय. नागपूर येथील सरकारी लाँ काँलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी बर्लिन येथे डिप्लोमाही केला आहे. ५४ वर्षीय देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती सध्या ३८ कोटी असल्याचे सांगितले जातेय.

किती आहे एकनाथ शिंदे यांची संपत्ती

एकनाथ शिंदे यांनी २००४ साली पहिली निवडणूक जिंकली होती. लागोपाठ चार वेळा ते निवडून आले आहेत. मुक्त विद्यापीठात एकनाथ शिंदे यांनी पदवी घेतली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत त्यांनी त्यांची संपत्ती १४.८३ कोटी असल्याचे सांगितले आहे. ते सध्या ६० वर्षांचे आहेत.

उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती

उद्धव ठाकरे हे ६४ वर्षांचे आहेत. २७ जुलै १९६० साली त्यांचा जन्म झाला. मुंबईत सर जेजे काँलेज ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी ग्रँज्युएशन पूर्ण केलं. त्यांना फोटोग्राफीचा छंदही आहे. उद्धव ठाकरे यांची संपत्ती ४३.२६ कोटी रुपये आहे.

नाना पटोले यांचे शिक्षण किती

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जन्म ५ जून १९६३ रोजी बांद्रा येथे झाला. नाना पटोले यांनी साकोली येथील एम. बी. पटेल काँलेजमधून शिक्षण घेतले. नाना पटोले यांची संपत्ती दोन कोटी २८ लाख रुपये आहे. ते सध्या ६१ वर्षांचे आहेत.

अजित पवार यांचे शिक्षण किती

बारामतीतून सलग सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उरतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यानी फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांची संपत्ती ४५.३७ कोटी रुपये आहे. अजित पवार हे सध्या ६५ वर्षांचे आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+