Ready reckoner rate : घरांचे भाव वाढणार! रेडी रेकनदर दर वाढवला, कोणत्या शहरात किती दर? वाचा
Maharashtra ready reckoner hike : आधीच घर खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्यातून बाहेर जात असतानाच आता महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी रेडीरेकनर दरात वाढ केली आहे. याचा थेट परिणाम घर खरेदीवर होणार आहे म्हणजेच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. आजपासून वाढवलेले नवीन रेडी रेकनर दर नवीन दर 1 एप्रिल 2025 लागू होतील.
रेडी रेकनरदर वाढवल्याने साहाजिकच जागेचे भाव, घरांच्या किमतीतही वाढ होणार आहे. यामुळे महाराष्ट्रात मालमत्ता खरेदी करणे आता अधिक महाग झाले आहे, महाराष्ट्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दर (RRR) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेडी रेकनर दर सरासरी 4.39 टक्क्यांनी वाढले आहेत.

रेडीरेकनर दर (RRR) म्हणजे काय?
रेडी रेकनर दर हा विशिष्ट क्षेत्रातील मालमत्तेसाठी निश्चित केलेले किमान आधारभूत मूल्यांकन आहे. त्याला सर्कल रेट असेही म्हणतात. या वाढीमुळे मालमत्तांच्या किमती वाढतात, त्यामुळे तुम्ही जर एखादे घर अथवा जमीन घेतल्यास त्याचे आधीच्या दराऐवजी आता नवीन वाढीव दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे, जे पुर्वीपेक्षा अधिक असणार आहे.
रेडीरेकनर दरातील ही वाढ सुरुवातीला अपेक्षित असलेल्या 10 टक्क्यांपेक्षा खूपच कमी असली तरी, मुद्रांक शुल्कात कोणताही बदल नसला तरी त्याचा मालमत्तेच्या खर्चावर आणि खरेदीदारांच्या मुद्रांक शुल्कावर परिणाम होईल.
घर घेणाऱ्यांना बसणार झळ
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने RRR दरांमध्ये माफक वाढ स्वीकारली आहे पण दुसरीकडे इशाराही दिला की, या घटकांचा परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो, सरकारने परवडणारी घरे राखून बाजारातील वाढ राखण्यासाठी संतुलित दृष्टीकोन घेण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे याचा थेट फटका घर खरेदीदारांवर होत असतो तो यंदाही होईल अशी शक्यता आहे.
महायुती सरकारने राज्यात रेडी रेकनर दर वाढ केली आहे, त्यामुळे आता सामान्यांना घर घेताना थोडा विचार करावा लागणार आहे. घर खरेदीवर मुद्रांक शुल्क अधिक असेल. ते महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामीण क्षेत्र अशी त्यात विभागणी आहे त्यानुसार दरात तफावत आहे.
अशी आहे रेडी रेकनर दरवाढ
महापालिका क्षेत्र - 5.95 टक्के (मंबई वगळता)
राज्याची सरासरी वाढ - 4.39 टक्के (मुंबई वगळता)
मुंबई महापालिका क्षेत्र सरासरी वाढ - 3.39 टक्के
संपूर्ण राज्याची एकूण वाढ -3.39 टक्के
ग्रामीण क्षेत्र - 3.36 टक्के
प्रभाव क्षेत्र - 3.29 टक्के
नगरपरिषद/पंचायत क्षेत्र - 4.97 टक्के












Click it and Unblock the Notifications