मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस होणार! पुण्यासह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत पाऊस पडणार? जाणून घ्या
Maharashtra Rain Heavy rains will occur in Mumbai : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून आज 23 जुलै रोजी कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात आगामी दोन दिवस चांगला पाऊस पडेल, पुण्यात आकाश ढगाळ तर घाट विभागात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागने व्यक्त केली आहे.

आज बहुतेक ठिकाणी कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान 24 जुलै रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात आज 23 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच ठिकाणी आठवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे उद्या 24 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असून तुळस ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
मराठवाडा
मराठवाड्यात 23 जुलै रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागांना व्यक्त केली आहे तसंच 24 जुलै रोजी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
विदर्भ
विदर्भात 23 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा पाहण्याची शक्यता आहे. तर 24 जुलै रोजी विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, यासह तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही हवामान विभागांना व्यक्त केली आहे.
पुणे आणि आसपासचा परिसर
पुणे आणि आसपासच्या परिसरात 23 जुलै रोजी म्हणजे आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच अति हलक्या ते हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र घाट विभागात ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 24 जुलै रोजी पुण्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मात्र, तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
आज 23 जुलै रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरीस, सिंधुदुर्ग तसेच पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह या जिल्ह्यांना येलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात घाट विभाग तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली व नांदेड तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications