पुणे जिल्ह्याला पाऊस झोडपणार! राज्यातील या भागात अति मुसळधार सरी कोसळणार, जाणून घ्या पावसाची स्थिती
Maharashtra Rain : राज्यात 27 जुलै रोजी चांगला पाऊस झाला, आजही 28 जुलै रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
काल 27 जुलै रोजी रायगड, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला असून हीच स्थिती आज 28 जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात राहील.तेथे मुसळधार ते अति पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट
28 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसर
पुण्यात आज आणि उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे. म्हणून पुणे जिल्ह्याच्या घाट विभागासाठी आज व उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आज 28 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान कसे राहील हवामान?
महाराष्ट्रात 28 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात कोकण, मध्य महाराष्,ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती राहील. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 जुलैला विदर्भ आणि मराठवाडा पावसाचा जोर कमी राहील.
29 जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात मात्र काही ठिकाणीच पाऊस पडेल.
30 जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
31 जुलै रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.
1 ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशा अंदाज पुणे व्यक्त केला आहे.












Click it and Unblock the Notifications