Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Opinion Poll: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? सर्वेक्षणात 'या' नेत्याला सर्वाधिक पसंती

Maharashtra Election 2024 Opinion Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांकडून प्रचार सुरू असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून ही आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे.

ज्याला जनतेचा पाठिंबा मिळेल तोच सरकार स्थापन करेल. सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या परिस्थितीत सी-व्होटरने नुकतेच एक सर्वेक्षण केले असून राज्यात कोणाचे सरकार येणार, पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे सांगण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोणाला बसलेले पाहायचे आहे, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. त्यावेळी जनतेने दिलेल्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

maharashtra opinion poll

एकनाथ शिंदें मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

प्रत्यक्षात सर्वेक्षणात 5 नावे पर्याय म्हणून देण्यात आली होती. यामध्ये एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावांचा समावेश होता. या सर्वेक्षणात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वेक्षणात जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक मते दिली आहेत. राज्यातील 27.6 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे असल्याचे सांगितलं आहे.

उध्दव ठाकरेंना लोकांची दुसरी पसंती

या सर्व्हेक्षणात 22.9 टक्के लोकांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत आहे. तर 10.8 टक्के लोकांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी तिसरी पसंती दिली आहे.

शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे 5.9 टक्के लोकांना वाटते. तर 3.1 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांची निवड केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील जनता एकनाथ शिंदे यांच्या कामावर खूश नव्हती, परंतु गेल्या 6 महिन्यांत शिंदे यांनी ज्या प्रकारे राज्यात कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, त्यावरून जनतेचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.त्यामुळे लोकांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती दिली आहे.

विधानसभा निवडणूक 2019 पक्षानुसार आकडेवारी

एकूण जागा - 288
बहुमतासाठी - 145 जागा
भारतीय जनता पक्ष 105
शिवसेना 56
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 44
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन 2
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1
समाजवादी पक्ष 2
स्वतंत्र 23

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहे. महायुतीमध्ये भाजप + शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे, तर महाविकास आघाडी (MVA) मध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+