एकनाथ शिंदेंना घेऊन जाणाऱ्या वैमानिकाचा उड्डाण करण्यास नकार, जळगाव विमानतळावर थरार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde, Jalgaon Airplane News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव दौरा पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला रवाना होण्यासाठी निघाले. मात्र, काल रात्री जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील वैमानिकाने विमान उड्डान करण्यास थेट नकार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमातळावर रखडल्याने भराच काळ गोंधळ उडाला होता. परंतु, मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी वैमानिकास संवाद साधल्यावर अखेर रात्री उशीरा त्यांचे विमान मुंबईकडे रवाना झाले. परंतु, जळगाव विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा मात्र पाहायला मिळाला.
वैमिकाने उड्डाणास का दिला नकार?
मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिक सलग 12 तासांपासून विमान उडवण्याचे काम करत होता. त्याच्या प्रकृतीला आणि तांत्रिक नियमांनुसार अधिक काम करणे शक्य नव्हते. यामुळेच, वैमानिकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान उडवण्यास थेट नकार दिला. समोर कोण व्यक्ती आहे, याचा विचार त्या वैमानिकाने न करता सुरक्षेच्या दृष्टीने स्पष्ट नकार दिल्याचे सांगण्यात आले.

महाजन-पाटील धावले मदतीला
सदर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी वैमानिकाशी चर्चा केली. त्यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर, या चर्चेनंतर वैमानिकाने विमान उडवण्यास होकार दर्शवला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रात्री रवाना झाले, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
याप्रकरणावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया?
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, वैमानिकाच्या तब्येतीची अडचण होती. तब्येत म्हणण्यापेक्षा त्यांची काही वेळेचीही अडचण असेल. तांत्रिक अडचण होती. पण त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो.
कंपनीने त्यांच्या भाषेत त्यांना सांगितलं असेल.. विमान अखेर उडालं होतं. पायलटची किरकोळ अडचण होती. मात्र, ती अडचण आता दूर केली गेली, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.












Click it and Unblock the Notifications