काय आहे मंत्रालयातील ‘त्या' शापित केबिनची कहाणी? केबिन नंबर '602' नको रे बाबा!
Maharashtra Mantralaya story of cabin number 602 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे जेव्हा महायुती सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झाला. त्यावेळी अजित पवारांच्या सत्तेत येण्यानं मंत्रालयातली केबिन नंबर 602 पुन्हा चर्चेत आलं होतं. मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरची ही एक केबिन. ती केबिन शापित असल्याची चर्चा मंत्रालयात होत राहते. कारण आजपर्यंत ते केबिन ज्या-ज्या मंत्र्याला मिळालंय, त्या-त्या मंत्र्याला त्याच्या राजकीय आयुष्यात तोंड द्यावं लागलंय. या अफवाआणि अंधश्रद्धा सगळीकडे असतानाच दुसरीकडे अजित पवारांनीही आता क्रमांक 602 ची केबिन घेण्यास नकार दिला होता. ह्या केबिनची रहस्य काय आहे आणि कोणालाच हि केबिन का नको? जाणून घेऊयात सविस्तर...

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्व मंत्र्यांना दालन देण्याचं काम सुरू झालं आहे. यामध्ये 602 नंबरच्या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे. यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती आहे. 602 नंबरच्या या दालनाबद्दल एक समज पसरला आहे. तो म्हणजे इथं जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यलयीन कर्मचाऱ्यासाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. सुरुवातीला या दालनात मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं.
हेही वाचा : महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, जाणून घ्या- कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता बंगला
अजित पवार यांनी हे दालन घेण्यास नकार दिल्यानंतर सचिवांचा कक्ष रिकामा करण्यात आला आणि हे दालन पवार यांना देण्यात आलं. 602 हे केबिन अजित पवारांसाठी रिकामं असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव ब्रजेश सिंह तसंच उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचं केबिन रिकामं करण्यात आलं आणि ते अजित पवार यांना देण्यात आलं. हि 602 नंबरची केबिन शापित असल्याची चर्चा नेहमीच होत राहाते. या अंधश्रद्धेमुळे बहुतेक वेळा हे दालन रिकामेच असते. इथे बसण्यास बहुतेक मंत्री टाळाटाळ करतात.
602 केबिनबद्दल मंत्रालयात एक चर्चा असते, की इथं जो मंत्री बसतो, त्याच्या राजकीय कसोटीचा काळ सुरु होतो. असं म्हणतात की 2014 आधी 602 नंबरच्या केबिनमध्ये अजित पवार बसले होते. त्यानंतर योगायोगानं अनेकदा त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीनं हुलकावणी दिली. सिंचनसह शिखर बँकेवरुन घोटाळ्याचे आरोप झाले. नंतर 2019 मधली पहाटेची शपथ आणि 2023 मधली दुपारची शपथ अशा देशभर गाजणाऱ्या दोन शपथविधी त्यांनी घेतल्या.
हेही वाचा : 'हे' आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, गृह, अर्थ, ऊर्जा अन् बांधकाम खाते कोणत्या पक्षाला वाचा अख्खी यादी
2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसेंना 602 केबिन दिली गेली होती. खडसेंकडे ७ हून जास्त मंत्रीपदं होती. मात्र त्यांच्यामागे आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आणि मंत्रिपदाच्या दीडच वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला.एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते पांडुरंग फुंडकर 602 केबिनमध्ये आले. खडसेंच्या कृषीखात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मात्र त्यांचं अकाली निधन झालं.पांडुरंग फुंडकरांनंतर भाजपचे अनिल बोंडे 602 केबिनमध्ये आले. फुंडकरांच्या कृषीखात्याची जबाबदारी बोंडेकडे आली. मात्र मंत्री असूनही 2019 च्या निवडणुकीत बोंडेंचा पराभव झाला. नंतर राज्यसभेत खासदार घेऊन बोंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं गेलं.
त्यानंतर पुन्हा हि केबिन चर्चेत येण्याचं कारण म्हणजे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांचं वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालं आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये त्यांना 601, 602 आणि 604 अशी तीन दालनं शिवेंद्रराजेंना देण्यात आली आहे.खरंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर हे सर्वात मोठं दालन आहे. पण तिथे कोणीही जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्विकारणार का हे पाहावं लागेल.
हेही वाचा : अजितदादांचं ठरलं, दोन दिवस मंत्रालय आणि पाच दिवस...
मंत्रालयातले काही जण 602 केबिन बदनाम होण्याची चर्चांमागे वास्तूशास्त्राचा दाखला देतात. वास्रूशास्रात घर किंवा कार्यालयाचं तोंड दक्षिण दिसेला असणं अशुभ मानलं जातं. सहाव्या मजल्यावरच्या दालनांची रचना आणि दिशा बघितली तर मुख्यमंत्र्यांचं दालन पूर्व दिशेला, प्रधान सचिवांचं दालन पश्चिम दिशेला, उपमुख्यमंत्र्यांचं दालन उत्तर दिशेला आणि क्रमांक 602 दालन मात्र दक्षिण दिशेला आहे, म्हणून 602 केबिनचा जेव्हाही विषय निघतो, तेव्हा त्यात याचीही भर होते.












Click it and Unblock the Notifications