महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, जाणून घ्या- कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता बंगला
मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले.
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी बंगला तर नार्वेकरांना शिवगिरी बंगला मिळाला
विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला देण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. महायुतीच्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळाला आहे.

मंत्र्यांची नावं अन् त्यांना मिळालेला बंगला
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - रामटेक
- राधाकृष्ण विखे पाटील - रॉयलस्टोन
- पंकजा मुंडें - पर्णकुटी
- शंभूराज देसाईं - मेघदूत
- गणेश नाईक - पावनगड
- धनंजय मुंडें - सातपुडा
- चंद्रकांत पाटील - सिंहगड
- हसन मुश्रीफ - (क-८) विशाळगड
- चंद्रकांतदादा पाटील ब-१ - सिहगड
- गिरीश महाजन - सेवासदन
- गुलाबराव पाटील - जेतवन
- गणेश नाईक ब-४ - पावनगड
- दादा भुसे ब-३ - जंजीरा
- संजय राठोड - शिवनेरी
- धनंजय मुंडे - सातपुडा
- मंगलप्रभात लोढा - ब-५ विजयदुर्ग
- उदय सामंत - मुक्तागिरी
- जयकुमार रावल - चित्रकूट
- अतुल सावे - अ-३ शिवगढ़
- अशोक उईके - अ-९ लोहगड
- शंभूराजे देसाई - मेघदूत
- आशिष शेलार - व-२ रत्नसिषु
- दत्तात्रय भरणे - ब-६ सिध्दगड
- अदिती तटकरे - अ-५ प्रतापगड
- शिवेंद्रराजे भोसले - ३-७ पन्हाळगड
- माणिकराव कोकाटे - अंबर-२७
- जयकुमार गोरे - क-६ प्रचितीगड
- नरहरि झिरवाळ - सुरुचि ०९
- संजय सावकारे - अंबर-३२
- संजय शिरसाठ अंबर-३८
- प्रताप सरनाईक अर्वतो-५
- भरत गोगावले - सुरुचि ०२
- मकरंद पाटील - सुरुचि-०३












Click it and Unblock the Notifications