Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

झेडपी-पालिका निवडणुकीचे आज भवितव्य ठरणार! आरक्षण मर्यादेवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Local Body Reservation Supreme Court Verdict Today : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या लाखो नागरिकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ५०% आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी आज (२८ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

राज्यातील अनेक जिल्हा परिषद (झेडपी), नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये अतिरिक्त आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली जाणार की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना, न्यायालयाचा हा निर्णय राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकांचे भवितव्य आणि वेगळी समीकरणं ठरवणारा असू शकतो.

Maharashtra Local Body Reservation

नेमके प्रकरण काय आहे?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची ५०% मर्यादा ओलांडल्याबद्दल एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यातील ४० नगरपरिषद आणि १७ नगरपंचायतींमध्ये ५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचे निवडणूक आयोगाने मान्य करत आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहे.

न्यायालयाचे लक्ष आणि निवडणूक आयोगाची भूमिका

मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा परिषद (झेडपी) आणि नगरपंचायतीमधील आरक्षणाची माहिती निवडणूक आयोगाकडून मागवली होती. त्यानुसार आयोगाने माहिती सादर केली आहे.

निवडणूक आयोगाची भूमिका काय?

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. कारण आरक्षणाची मर्यादा ओलांडणे हे यामागील सर्वात मोठे कारण आहे. सध्या राज्यात २४० नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाने या निवडणुकांवर (२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ स्थानिक स्वराज्य संस्था) स्थगिती देण्यास नकार दिला होता.

आजच्या निकालाचे महत्त्व

सध्या नगरपालिका निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आजचा न्यायालयाचा निर्णय या मतदान प्रक्रियेवर काय परिणाम करतो, हे स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका कधी होणार, हे पूर्णपणे आजच्या निकालावर अवलंबून असेल. अतिरिक्त आरक्षणामुळे या निवडणुका लांबणार की काय, या संदर्भात न्यायालयाचा आजचा निर्णय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+