Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बिगुल वाजला! राज्यात 288 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक जाहीर;2 डिसेंबरला मतदान, 3 रोजी निकाल

Maharashtra local body elections 2025 : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी आज, ४ नोव्हेंबर २०२५ पासून, आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर!

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगरपंचायती, ३३६ पंचायत समिती आणि २४६ नगरपालिकांची मुदत संपलेली आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत.

पहिला टप्पा

या संपूर्ण प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका (नगरपरिषदा) आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येत आहेत.

  • निवडणूक प्रकार - मतदानाची तारीख - मतदानाचे माध्यम - मतमोजणी व निकाल
  • नगरपरिषदा (२४६) - २ डिसेंबर २०२५ - इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) - ३ डिसेंबर २०२५
  • नगरपंचायती (४२) - २ डिसेंबर २०२५ - इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) - ३ डिसेंबर २०२५

या घोषणेने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.

maharashtra local body elections 2025

निवडणूक वेळापत्रक आणि व्याप्ती

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी खालीलप्रमाणे मतदान आणि मतमोजणी होणार आहे:

  • संस्थांचा प्रकार - संख्या - मतदानाची तारीख - मतमोजणीची तारीख
  • नगरपरिषदा - २४६ - २ डिसेंबर - ३ डिसेंबर
  • नगरपंचायती - ४२- २ डिसेंबर - ३ डिसेंबर
  • एकूण संस्था - २८८

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

  • निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असेल. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल.
  • अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. तर अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल.
  • 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल.
  • त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा संदर्भ देत निवडणुका जाहीर केल्या.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : ३१ जानेवारी २०२६ पूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

नगरपरिषदांची स्थिती : एकूण २४६ नगरपरिषदांपैकी, २३६ नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे, तर १० नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला आहे.

नगरपंचायतींची स्थिती : एकूण १४७ नगरपंचायतींपैकी, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात २७ नगरपंचायतींची मुदत संपली आहे, तर १५ नवनिर्मित पंचायतींचा समावेश आहे. उर्वरित १०५ नगरपंचायतींची मुदत सध्या समाप्त झालेली नाही.

मतदानाची पद्धत आणि बहुसदस्यीय प्रभाग

या निवडणुकीत मतदारांना एकापेक्षा जास्त उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे.

नगरपरिषदेत मतदान : नगरपरिषदेची सदस्य संख्या सामान्यतः २० ते ७५ असते. नगरपरिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनुसार घेतली जाते.

एका प्रभागात सर्वसाधारणपणे २ जागा असतात.

जर सदस्यसंख्येचा आकडा विषम असेल, तर तिथे ३ जागा असतात. म्हणजेच, मतदारांना साधारणत : २ ते ३ सदस्यांसाठी मतदान करावे लागणार आहे.

नगरपंचायतीत मतदान :

नगरपंचायतीची सदस्यसंख्या १७ असते. यात १ सदस्य आणि १ अध्यक्ष असतो. त्यामुळे मतदारांना दोन मते (सदस्य व अध्यक्ष) द्यावी लागतील.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया: संपूर्णतः ऑनलाईन

निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवली आहे.

ऑनलाईन अर्ज : उमेदवारी अर्ज संपूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आयोगाने यासाठी एक विशेष पोर्टल तयार केले आहे.

एका प्रभागातून अर्ज : एका उमेदवाराला एका प्रभागात अधिकाधिक ४ उमेदवारी अर्ज भरता येतील.

प्रिंटआऊट जमा करणे : संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करावी लागेल.

जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक : उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) देणे बंधनकारक आहे.

पावतीची सवलत : ज्या उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला उमेदवारी अर्ज भरता येईल.

एकूण किती मतदार?

एकूण मतदार - 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
महिला मतदार - 53 लाख 22 हजार 870

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+