Honeytrap महाराष्ट्रात रम, रमा रमणीचा खेळ! महायुती सरकारचे 5 मंत्री घरी जाणार! कुणी केला दावा? वाचा
Maharashtra Honeytrap Case : राज्यात हनीट्रॅप प्रकरण चांगलेच गाजत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार प्रवक्ते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी या प्रकरणात आरोप केले आहेत. यासह त्यांनी एक पोस्ट आणि व्हिडिओही जारी केला होता. उत्तर महाराष्ट्रातील मंत्री या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा त्यांचा दावा आहे. सामनाच्या अग्रलेखातही असाच दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले असल्याचा आरोप करत रम, रमा, रमणी महामंडळ तसंच हनीट्रॅपमध्ये अडकलेले काही मंत्र्यांना घरी जावे लागणार असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करीत सिगारेट फूंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय, चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय. असं म्हणत 'रम, रमी, रमणी'महामंडळ या शिर्षकाखाली हा अग्रलेख देण्यात आला आहे.
या मंत्र्यांपैकी काहींना घरी जावे लागणार- सामनाचे भाकित
सामनाच्या अग्रलेखात दावा करण्यात आला की, मंत्र्यांचे उपद्व्याप आणि प्रताप ज्या पद्धतीने समोर येत आहेत ते पाहता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील व पाच ते सहा मंत्र्यांना लाथ मारून घरी बसवावे लागेल. राजकीय वर्तुळात अशा मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. संजय शिरसाट, योगेश कदम, माणिक कोकाटे, दादा भुसे, संजय राठोड व नाशिकच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकलेल्या पाच मंत्र्यांपैकी काहींना जावे लागेल. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 'हनी ट्रॅप' वगैरे काही नाही असे मुख्यमंत्री म्हणतात, फडणवीस यांचे हे बोलणे वरवरचे आणि सरकारची अबू सावरण्यासाठी आहे असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
हनीट्रॅपसाठी इस्त्रायलहून यंत्रणा आणल्याचा दावा
सामनाच्या अग्रलेखात दावा करण्यात आला की, हनीट्रॅपसाठी यंत्रणा इस्रायलमधून आणली होती आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करून आमदार, खासदारांवर 'ट्रॅप' लावण्यात आले. त्या ट्रॅपमुळे तेव्हाचे महाविकास आघाडी सरकार कोसळले हे अलीकडच्या घडामोडींवरून स्पष्ट होते असा दावा सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या जो 'रम, रमा, रमणी'चा खेळ चालला आहे, त्यात भाजपचे मंत्रीही नक्कीच आहेत असंही म्हटलं आहे.
'हनी ट्रॅप'च्या सूत्रधाराबद्दल दावा
सामनाच्या अग्रलेखात'हनी ट्रॅप'चा सूत्रधाराबाबत वक्तव्य केले असून लोढावर आरोप करण्यात आला तर हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष 'महाजन' वगैरे लोक आहेत असा दावाही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 'हनी ट्रॅप'चा विषय उडवून लावला. मग प्रफुल लोढाला जीवे मारण्याच्या धमक्या कोणता मंत्री देत आहे? लोढाच्या घरावर पोलीस धाडी का घालत आहेत? असा सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान?







Click it and Unblock the Notifications