प्रतिक्षा संपली! पराक्रम गाजवणारी शिवरायांची वाघनखे आली साताऱ्यात
सातारा : गेल्या कित्येक काळापासून असलेली प्रतिक्षा आता संपली आहे. पराक्रम गाजवणाऱ्या प्रसंगात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आज साताऱ्यात पोहचली आहेत.
विशेष म्हणजे शुक्रवारी येणारी वाघनखे बुधवारीच साताऱ्यात आणण्यात आली, यासाठी कडक बंदोबस्त आणि कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

या वाघनखांद्वारे अफजलखानाचा वध
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच वाघनखाद्वारे 1659 मध्ये प्रतागडावर अफजलखानाचा वध केला होता. मात्र ती वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरीया अल्बर्ट संग्रहालयात होती. ती तेथून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संग्रहालयातून आणण्याची घोषणाही केली होती.
अखेर आणली लंडनहून वाघनखे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा शहरात दोन दिवस आधीच दाखल झाली आहेत. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून आणली आहेत.
आज ती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली. मात्र काही कारणास्तव ती यायला उशीर झाला. आज ही वाघनखे साताऱ्यात दाखल झाली. ही वाघनखे साताऱ्यात आणताना गुप्तता पाळण्यात आली होती.
उद्या संग्रहालयाचे उद्घाटन
शिवरायांची वाघनखे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी या संग्रहालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. 19 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवार,पालकमंत्री शंभूराज देसाई,खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीतीत होणार आहे. यानंतर सात महिने ही वाघनखे या संग्रहालयात नागरिकांना पाहता येणार आहेत.
या संग्रहालयाचे नव्या प्रशस्त इमारतीत उदघाटन आणि स्थलांतर होणार असल्याने या संग्रहालयाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.












Click it and Unblock the Notifications