Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार! शेतकऱ्यांना कर्जमाफी, अमित शहांकडून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Maharashtra Elections BJP Manifesto from Amit Shah : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत आज भाजपचे 'संकल्प पत्र' प्रसिद्ध केले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असून नवउद्योजकांना 15 लाखांचे कर्ज दिले जाणार असल्याचं भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. महिला, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनाही मोठी आश्वासने या जाहीरनाम्यात दिली आहे.

Maharashtra Elections BJP Manifesto from Amit Shah

भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?

  • शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
  • लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना
  • प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन
  • वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता 2100 रुपये करणार
  • 25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
  • विद्या वेतनाच्या माध्यमातून आम्ही अग्रेसर असणार
  • 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार
  • गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न करणार
  • फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल
  • एरोनॉटिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी
  • शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न
  • 2027 पर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न
  • महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार
  • महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार
  • 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न असेल
  • युवामध्ये फिटनेस असली पाहिजे, त्यासाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार आहोत
  • गडकिल्ल्यांसाठी प्राधिकरण तयार करणार आहोत
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण करणार आहोत


(ही बातमी अपडेट होत आहे.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+