Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोकणपट्ट्याचा उद्धव ठाकरेंना तडाखा; बालेकिल्ला उद्धवस्त! राणे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध

Maharashtra Election Result 2024 : कोकण आणि शिवसेना हे अतूट नाते मांडले जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कोकणावर विशेष जीव होता. तळ कोकणातल्या सावंतवाडी पासून अलिबाग पर्यंत बहुतांश जागा एकेकाळी शिवसेना जिंकायची. पनवेल, रत्नागिरी, देवगड या जागाच फक्त भाजपला मिळायच्या. यावेळेस मात्र सगळा खेळ उलट झाला असून उद्धव ठाकरे यांचा एकमेव आमदार संपूर्ण कोकणपट्ट्यातून निवडून आला आहे.

तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. त्यापैकी दोन जागा 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत त्या दोन्ही जागा उद्धव यांच्या हातातून निसटले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यावर कब्जा केला आहे. सावंतवाडीतून दीपक केसरकर आणि कुडाळ मालवण मधून निलेश राणे विजयी झाले.. उरलेला कणकवली मतदारसंघ भाजपच्या नितेश राणे यांनी जिंकला आहे.

Maharashtra Election Result 2024

रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेनेचे चार चार आमदार निवडून यायचे यावेळी भास्कर जाधव यांच्या रूपाने एकमेव आमदार निवडून आला आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे राजन साळवी यांनी तीन वेळा नेतृत्व केले. यावेळी हा मतदारसंघ शिंदे सेनेच्या किरण सामंत यांनी जिंकला. रत्नागिरी मतदारसंघावर शिंदे सेनेच्याच उदय सामंत यांचे वर्चस्व राहिले. चिपळूण मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे ठेवला. दापोली विधानसभा मतदारसंघ देखील एकनाथ शिंदे यांच्या योगेश कदम यांनी जिंकला. एकट्या गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धव गटाचे भास्कर जाधव निसटत्या फरकाने जिंकून आले.

रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघ भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी जिंकला. कर्जतमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विजय मिळवला. या मतदारसंघातील उद्धव गटाचे नितिन राऊत तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. उरणमध्ये भाजपचे महेश बालदी विजयी झाले आणि ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर तिसऱ्या स्थानी राहिले.

पेणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांना हरवून भारतीय जनता पार्टीचे रविशेठ पाटील विजयी झाली आहे. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी विजय मिळवला. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे विजयी झाल्या. महाडमध्ये शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा विजय झाला असून, त्यांनी २६,२१० मतांनी शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा पराभव केला.

सारांश

थोडक्यात साडेचारशे किलोमीटरच्या या टापूत ठाकरे गटाचा अवघा एक उमेदवार निवडून आला आहे. 2019 साली याच टापूत उद्धव यांच्या नेतृत्वाखाली तब्बल नऊ आमदार निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही खूपच चिंतेची बाब आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+