जनतेनेच सांगितले; खरी शिवसेना कुणाची? बहुसंख्य जागी शिंदेंच्या उमेदवारांचा विजय, वाचा कुठे कोण विजयी
Maharashtra Election Result 2024 : 2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि बंड केले. 40 आमदार आणि आठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद देखील मिळवले. शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना विविध न्यायिक व्यासपीठावर देण्यात आले.
माझा पक्ष चोरला, माझे चिन्ह चोरले, माझा बाप चोरला, आता फैसला जनतेच्या कोर्टातच होईल, असे उद्धव ठाकरे त्यानंतर म्हणू लागले. जनतेच्या न्यायालयात आधी लोकसभेला पुसटसे संकेत मिळाले होते विधानसभा निवडणुकीत मात्र खरी शिवसेना कोणाची याचा फैसलाच जनतेने केल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल 51 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला यातील बहुसंख्य ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.
कोकणपट्ट्यात उद्धव ठाकरे गटाचा पुरता सफाया झाला. सावंतवाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे दीपक केसरकर, कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे, राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंत, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत, खेड दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम विजयी झाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे फक्त भास्कर जाधव तेवढे निवडून येऊ शकले.
एकेकाळी या दोन्ही जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेला मिळत होत्या, रायगड जिल्ह्यात देखील उद्धव ठाकरे गटाला चांगलाच दणका मिळाला. महाड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भरत गोगावले यांनी विजय मिळवला. कर्जत मध्ये महेंद्र थोरवी विजयी झाले.
ठाणे जिल्ह्यात तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचा सुपडा साफ करून टाकला. कल्याण पश्चिम मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे विश्व भोईर, भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे,कल्याण ग्रामीण मध्ये राजेश मोरे, ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात प्रताप सरनाईक, कोपरी विधानसभा मतदारसंघात स्वतः एकनाथ शिंदे विजयी झाले.
मराठवाड्यात देखील एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेचा बोलबाला राहिला छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि छत्रपती संभाजी नगर मध्य या दोन्ही मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे उमेदवार विजयी झाले. सिल्लोड मतदारसंघ अब्दुल सत्तार यांनी, पैठण विधानसभा मतदारसंघ विलास भुमरे यांनी, कन्नड विधानसभा मतदारसंघ संजना जाधव यांनी, वैजापूर रमेश बोरनारे यांनी, चोपडा चंद्रकांत सोनवणे, नांदगाव सुहास कांदे, मालेगाव बाह्य दादा भुसे, राधानगरी प्रकाश आंबेडकर, बुलढाणा संजय गायकवाड, रामटेक मध्ये आशिष जयस्वाल, पाटण मध्ये शंभूराज देसाई आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघात किशोर पाटील यांनी विजय मिळवला. नेवासा विधानसभा मतदारसंघ देखील एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने जिंकला. धाराशिव आणि उमरगा तसेच दर्यापूर या मतदारसंघात मात्र उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला.
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबई परिसरात संमिश्र यश मिळवले. भायखळा विधानसभा मतदारसंघात उद्धव गटाचे मनोज जामसुतकर, वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडून आले. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती सर्वाधिक मुंबई पट्ट्यात होत्या त्यातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे प्रकाश सुर्वे विजयी झाले. चेंबूर मध्ये तुकाराम काते आणि विजय मिळवला.
अंधेरी पूर्व मध्ये मुर्जी पटेल विजयी झाले. कुर्ला विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे मंगेश कुडाळकर विजयी झाले. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाळा नर यांनी एकनाथ शिंदे यांच्या मनीषा वायकर यांचा पराभव केला.












Click it and Unblock the Notifications